एकरुखे : पुढारी वृत्तसेवा : श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याचा या हंगामात किमान सव्वातीन लाख टन ऊसाचे गाळप करुन तोटा आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करु. संचालक मंडळासह कामगारांनी गणेशला ऊस कसा मिळेल यासाठी प्रयत्न करावे, असे सांगत शाल, श्रीफळ नको म्हणा, पण आमच्या गणेशला ऊस द्या, असे म्हणा, असे आवाहन सहकार महर्षी कोल्हे साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांनी केले. श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या सन 2023-24 च्या गळीत हंगामासाठी मिल रोलर पूजन कारखान्याचे चेअरमन सुधीर लहारे, व्हा. चेअरमन विजय दंडवते, युवा नेते विवेक कोल्हे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला. यावेळी ते बोलत होते.
कोल्हे यांनी संचालक मंडळासमवेत कारखाना व परिसराची पाहणी करून समस्या जाणून घेत आवश्यक सूचना दिल्या.
गणेश कारखाना चालविण्यासाठी उसाचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सभासद व कामगार यांनी ऊस उपलब्ध करण्यास सहकार्य करावे. कालव्यातून रोटेशन मिळण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. गणेशला गत वैभव प्राप्त करून देऊ, असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला.
संचालक अॅड. नारायणराव कार्ले म्हणाले, सभासद व कामगारांनी सहकार्य करावे. ऊस वाढी साठी मेळावे आयोजित करू. नवीन जातीची ऊस लागवड करण्याबाबत मार्गदर्शन करणार आहे. चेअरमन सुधीर लहारे यांनी कामगार व सभासदांचे आभार माणून गणेश चालविण्यास सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले.
याप्रसंगी डॉ. एकनाथ गोंदकर, गंगाधर चौधरी, गणेशचे माजी उपाध्यक्ष शिवाजीराव लहारे, डॉ. वसंतराव लबडे, संचालक बाबासाहेब डांगे, संपतराव हिंगे, अनिल टिळेकर, बाळासाहेब चोळके, मधुकर सातव, महेंद्र गोर्डे, अनिल गाढवे, गंगाधर डांगे, विष्णुपंत शेळके, आलेश कापसे, शोभाबाई गोंदकर, कमलबाई धनवटे, अरुंधती फोपसे, चंद्रभान धनवटे, संजय सरोदे, अविनाश दंडवते, सुरेश गमे, नितीन येलम, अप्पासाहेब बोठे, विजय फोपसे, अॅड. पंकज लोंढे, महेश जाधव, श्रीकांत मापारे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर आदी उपस्थित होते.
पाण्याचे नियोजन होणे गरजेचे..!
'गणेश'चे चक्र फिरणार असले तरी ऊस क्षेत्र वाढण्यासाठी पाण्याचे नियोजन होणे गरजेचे आहे. ऑगस्ट महिना उजाडला तरी कालवे कोरडेठाक असल्याने ही चिंतेची बाब असल्याचा सूर उमटत आहे.
हेही वाचा :