अहमदनगर

डॉ. विखे यांना धमकावणार्‍यांविरुद्ध कारवाई करा : महायुतीच्या शिष्टमंडळाची मागणी

Laxman Dhenge

नगर : पुढारी वृत्तसेवा : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांना धमकी देणार्‍या व्यक्ती आणि त्यांना पाठबळ देणार्‍यांच्या विरोधात तातडीने कारवाई करावी, तसेच खा. डॉ. विखेंच्या संरक्षणात वाढ करण्याची मागणी महायुतीच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे केली. खा. डॉ. सुजय विखे पाटील यांना गोळ्या घालण्याची धमकी देणारी कथित ध्वनिफीत समाजमाध्यमातून प्रसारित झाल्याने महायुतीच्या वतीने जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांना निवेदन देण्यात आले.

माजी मंत्री आणि जिल्हा बँकेचे चेअरमन शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप भाजपचे जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग, उतर नगरचे विठ्ठल लंघे, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, वसंत लोढा, सचिन पारखी, विश्वनाथ कोरडे, विनायक देशमुख, बाबुशेठ टायरवाले, विक्रमसिंह पाचपुते, शिवसेनेचे अनिल शिंदे, यांच्यासह सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. धमकी देणारी व्यक्ती कोणाची समर्थक आहे, कोणाचे पाठबळ त्यांना आहे, हे उघड होणे गरजेचे असून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने निवेदनातून केली आहे.

दरम्यान, एका व्यक्तीने व्हिडीओ प्रसारित करून मांडलेल्या भूमिकेविरोधात शिवसेनेचे अनिल शिंदे यांनी पोलिस अधीक्षकांना स्वतंत्र निवेदन दिले. संबंधित व्यक्तीचा शिवसेनेशी संबंध नाही. त्याचे विरोधी उमेदवारासमवेत असलेले फोटो, तसेच डॉ. विखे यांच्या विरोधात त्याने समाजमाध्यमात केलेल्या टीकात्मक प्रतिक्रियेचे पुरावेही शिंदे यांनी पोलिस अधीक्षकांना दिले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT