अहमदनगर

शिवसैनिक आक्रमक : संगमनेरात माजी खासदार यांचा पुतळा टांगला उलटा

अमृता चौगुले

संगमनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : गद्दार नको निष्ठावंत हवा अशा घोषणा देत संगमनेरात ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा उलट्या पध्दतीने पुतळा लटकवीत अभिनव आंदोलन करण्यात आले. केले. शिवसैनिकांच्या या आक्रमक भूमिकेमुळे माजी खा. वाकचौरे यांचा ठाकरे गटातील प्रवेश वादाच्या भवर्‍यात सापडला आहे. शिवसेनेला जय महाराष्ट्र करून काँग्रेस आणि भाजपमध्ये प्रवेश केलेले वाकचौरे यांनी एकदा शिर्डी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष तर भाजपकडून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातून विधानसभेची निवडणूक लढवली होती. मात्र दोन्ही वेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.

मात्र लोक सभा निवडणुकीच्या तोंडावर विद्यमान खा. सदाशिव लोखंडे हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गेले. त्यामुळे वाकचौरे यांनी ठाकरे गटाच्या शिवसेनेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांचा 23 ऑगस्ट रोजी मुंबईत उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत जाहीररित्या प्रवेश होणार आहे. संगमनेर विधानसभा व शिर्डी लोक सभेच्या निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसेनेचाच उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करावे, अशा सूचना शिवसेना पदाधिकार्‍यांच्या बैठकीमध्ये देण्यात आल्या होत्या.

त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची गद्दारी करणार्‍या वाकचौरे यांच्यामुळे आमच्यावर अनेक केसेस झालेल्या आहेत. त्यामुळे आठ ते नऊ वर्षापासून आम्हाला कोर्ट कचेरीच्या चकरा माराव्या लागत आहे. त्यामुळे गद्दार नको निष्ठावंत हवा अशा घोषणा देत वाकचौरे यांच्या प्रवेशाबाबत शिवसेनेच्या पदाधिकार्‍यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत माजी खा. भाऊसाहेब वाकचौरे यांचा पुतळा उलटा लटकवत तीव्र संताप व्यक्त केला.

पक्षप्रमुखांची भेट घेणार

शिवसेनेशी एकदा दोनदा नव्हे तर तीन वेळा गद्दारी करणार्‍या माजी खा. वाकचौरे सारख्या गद्दाराला कोणत्याही परिस्थितीत शिवसेनेत प्रवेश देऊ नये असे आम्ही सर्व शिवसेना पदाधिकारी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन सांगणार असल्याचे शिवसेनेचे शहरप्रमुख अमर कतारी, तालुका प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे यांनी बोलताना सांगितले.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT