अहमदनगर

अहमदनगर शहराच्या सौंदर्यात भर टाकणारे प्रकल्प उभारू : महापौर रोहिणी शेंडगे

अमृता चौगुले

अहमदनगर; पुढारी वृत्तसेवा : शहरतील प्रमुख चौकांचे सौंदर्यकरण करून परिसर स्वच्छ व सुंदर करण्यात येत आहे. सिद्धीबाग येथील जलतरण तलावाबाहेरील या ठिकाणी असलेल्या पूर्वी भगवान शंकर कारंजा हे सर्वांचे आकर्षण होते. हा कारंजा अनेक दिवसांपासून बंद होता. आता या कारंजाची आधुनिक पद्धतीने नूतनीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या भागाबरोबरच शहराच्या सौंदर्यात भर पडेल. असेच प्रकल्प शहराच्या विविध भागात पुढील काळात राबविण्यात येणार आहेत. त्यासाठी मनपाच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येत आहे, असे प्रतिपादन महापौर रोहिणी शेंडगे यांनी केले.

सिद्धीबाग जलतरण तलाव परिसरात कारंजा नूतनीकरण कामाला महापौर रोहिणी शेंडगे यांच्या हस्ते सुरूवात करण्यात आली. याप्रसंगी शहरप्रमुख संभाजी कदम, मनपा स्थायी समिती सभापती गणेश कवडे, महिला बालकल्याण समिती सभापती पुष्पा बोरुडे, माजी विरोधीपक्ष नेते संजय शेंडगे, माजी महापौर भगवान फुलसौंदर, माजी सभागृहनेते अशोक बडे, नगरसेवक श्याम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनप्पा, योगीराज गाडे, दत्ता जाधव, प्रशांत गायकवाड, भालचंद्र भाकरे, सुरेश तिवारी, अशोक दहिफळे, गिरीष जाधव, संग्राम कोतकर, मंदार मुळे, प्रताप गडाख, बंटी खैरे, प्रणव भोसले आदी उपस्थित होते.

सभापती गणेश कवडे म्हणाले, शहराच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत. सिद्धीबाग जलतरण तलावाजवळी भगवान शंकर कारंजा तयार झाल्यानंतर सर्वांनाच नक्कीच आकर्षित करेल, असा विश्वास व्यक्त केला. यावेळी पुष्पाताई बोरुडे, भगवान फुलसौंदर, श्याम नळकांडे आदींनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन सचिन शिंदे यांनी केले तर, आभार संतोष गेनप्पा यांनी मानले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT