नगर तालुका : पुढारी वृत्तसेवा : कंटेनर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात एकजण ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील पांढरीपुलावर गुरुवारी (दि. 29) दुपारी घडली. इमामपूर घाट उतरून छत्रपती संभाजीनगरकडे जाणार्या कंटेनरने ( क्र. एम. एच.14 के. ए. 3651) दुचाकीस धडक दिल्याने अपघात घडला. कंटेनरने सुमारे पाचशे फूट अंतरापर्यंत दुचाकी फरपटत नेली. त्यामध्ये इस्माईल अल्लाबक्ष शेख (रा. मजले चिंचोली, ता. नगर ) यांचा जागीच मृत्यू झाला. तर नवनाथ भाऊसाहेब बोरुडे व दादासाहेब मारुती सरक (दोघे रा. खोसपुरी ता. नगर) हे गंभीर जखमी झाले आहेत.
घटनास्थळी सामाजिक कार्यकर्ते आदिनाथ काळे, अमोल सुद्रिक, जोडमोहजचे माजी सरपंच पिंटू खाडे, शेखर खंडागळे, शिवराज काळे, अतुल भवार, अर्जुन भवार, यांनी जखमींना रुग्णालयात दाखल करण्यासाठी मदत केली. सोनई पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन वाहतूक सुरळीत केली. पांढरी पूल परिसरात अपघातांची मालिका सुरूच असून, अनेक जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. अपघात टाळण्यासाठी उपाययोजना कराव्यात, या मागणीसाठी पंचक्रोशीतील नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. बांधकाम अधिकार्यांनी पाहणी करून उपाययोजना करण्याचे आश्वासन देखील दिले होते.
परंतु काहीही उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. पांढरीपूल परिसरातील अपघातावर नियंत्रण मिळविण्यासाठी तात्काळ उपायोजना करण्याची मागणी आदिनाथ काळे, खोसपुरीचे माजी सरपंच सोमनाथ हारेर, वांजोळी चेअरमन बद्रिनाथ खंडागळे, सरपंच अविनाश आव्हाड, बाबाभाई शेख, संतोष बोरुडे, दादासाहेब बडे, अमोल पवार, महादेव औटी यांनी केली.
हेही वाचा