nitin gadkari : जिल्ह्यातील महामार्गांच्या 4075 कोटी रूपयांच्या 25 प्रकल्पांचे भूमिपूजन व लोकार्पण केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत आज झाले. शरद पवार यांच्यासह ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी यावेळी गडकरी यांच्या कामाचे कौतुक केले.
रस्ते वाहतूक ही सर्वसामान्यांसाठी महत्वाची असते, त्याला गती देण्याचे काम गडकरी nitin gadkari करत आहेत. अन्य राज्यात रस्त्याने प्रवास करताना जेव्हा लोक भेटतात, तेव्हा ते गडकरी यांची कृपा असल्याचं सांगतात. गडकरी कामं मंजूर करताना राजकारण पाहत नाहीत, मागणी काय आहे ते पाहतात. त्यामुळं सर्व पक्षाच्या लोकांची कामे होतात असे पवार यांनी गडकरी यांची जोरदार स्तुती केली.
इतर कार्यक्रमाला गेलं की वर्षानुवर्षे काही बदल दिसत नाही. पण गडकरी nitin gadkari यांच्या कार्यक्रमाला गेलं की दोन चार दिवसांत फरक दिसतो. एखादा नेता देशाच्या उभारणीत कसं योगदान देतो हे गडकरी यांच्याकडे पाहून लक्षात येतं, अशा शब्दांत पवारांनी गडकरींच्या कामाचं कौतुक केले. रस्ते, पिके व विकासाची परिस्थिती पाहायला मिळते, त्यामुळे मी शक्यतो रस्त्यानं प्रवास करतो, असेही पवार म्हणाले.
या कार्यक्रमाला शरद पवार उपस्थित राहणार असल्यानं राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या होत्या. आमदार रोहित पवार यांच्या मार्फत या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचा निरोप मिळाला. मी यावे असे गडकरींचे म्हणणे होते. त्यामुळे मला येणे भाग पडले. मी आल्यावर या भागातील कामे मार्गी लागतील म्हणून आलो, असे पवार यावेळी म्हणाले. आजचा कार्यक्रम नगर जिल्ह्याला नवीन दिशा दाखविणारा आहे, असेही पवार म्हणाले.
केंद्रात फक्त नितीन गडकरी यांच्याच खात्याचे काम उठावदार आहे. गडकरी हजारो कोटी रुपयांची कामे करतात, आकडे पाहूनच आमचे डोळे पांढरे होतात, अशा शब्दात मुश्रीफ यांनी गडकरींच्या कामाची प्रशंसा केली. नगर जिल्ह्यातील नवीन कामाच्या मागणीकडे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी लक्ष वेधले.
हे ही वाचलं का?