अहमदनगर

नगर : जामखेडमध्ये दहशत करण्याच्या हेतूने हवेत गोळीबार

backup backup

जामखेड, पुढारी वृत्तसेवा : जामखेडमध्ये किरकोळ भांडणातून दहशत निर्माण करण्याच्या हेतूने (दि १ जून) रोजी हवेत गोळीबार केल्याची घटना घडली आहे. शहरातील रयत शिक्षण संस्थेच्या नागेश शाळा रोडवरील अक्सा मस्जिद परिसरात आपसातील भांडणावरून दहशत निर्माण करण्यासाठी एका अज्ञान व्यक्तीने हवेत गोळीबार केला. सदरील गोळीबारातुन संबंधीताने दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.

गोळीबाराच्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून भीतीदायक वातावरण आहे. याबाबत पोलीस स्टेशनला अद्याप कोणतीही तक्रार दाखल झालेली नाही. पोलीस प्रशासनाने अशा लोकांची झाडाझडती घेण्याची गरज आहे, शहर तालुक्यात मोठय़ा प्रमाणावर अवैध शस्त्रे असल्यानेच अशा घटना घडत असल्याचे बोलले जात आहे. यानंतर पोलीसांनी शोध मोहीम हातात घेतली आहे. त्यामुळे अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांना कडक शिक्षा केली पाहिजे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT