अहमदनगर

Nagar Crime news : ‘त्या’ कैद्यांना 4 दिवसांची कोठडी

अमृता चौगुले

संगमनेर : पुढारी वृत्तसेवा :  संगमनेर शहर पोलिस ठाण्यात असणार्‍या उपकरगृहाचे गज कापून पळालेले चारही कैदी जळगाव जिल्ह्यातील अंमळनेर तालुक्यात पाठलाग करून पकडले त्या कायद्यांना रात्री उशिराने संगमनेरला आणले. त्यांना काल न्यायालया मध्ये उभे केले असता न्यायालयाने त्यांना चार  दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. संगमनेर उपकारागृहात न्यायालयीन कोठडीत असलेले राहुल देवीदास काळे, रोशन रमेश ददेल उर्फ थापा, आनंद छबू ढोले व मच्छिंद्र मनाजी जाधव हे चौघे कैदी बॅरेक क्रमांक 3 मध्ये न्यायालयीन कोठडीत होते.  त्या चौघांनी कारागृहाचे दक्षिण बाजूचे गज कापून कारागृहाच्या बाहेर आले आणि कारागृहाच्या देखरेखीवर असणार्‍या गार्डलाच जीवे मारण्याची धमकी दिली आणि बाहेर उभे असलेल्या एका कारमधून पळून गेले.

संबंधित बातम्या :

कैदी पळून गेल्याची वार्ता सर्वत्र  पसरली. त्यानंतर  पोलिस प्रशासनाची झोपच उडाली. त्यानंतर संगमनेर उपविभागाचे पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी 3 पथके तयार केली तसेच अ. नगर जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेचे पथक  पळून गेलेल्या कैद्यांच्या तपासासाठी रवाना केले गेले. जिल्हा गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिस पथकाने त्या चार कैद्यासह दोन साथीदार अशा सहा जणांना जळगाव जिल्ह्यातील जामनेेर भागातून राज्यात पळून जात असताना वाहनासह सिनेस्टाईल पकडले आणि नगर येथे आणण्यात आले.
स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी पकडलेल्या चारही कैद्यांना रात्री संगमनेरला आणण्यात आले. त्यां च्यावर खुनाचा प्रयत्न अत्याचार पोस्को यासारखे गंभीरपणे अगोदरच आरोप दाखल होते.

पळून गेल्यानंतर पोहे कॉ. अनिल धनवट यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात कायदेशीर रखवालीतून पलायन करणे या कलमानुसार गुन्हा दाखल कर ण्यात आला होता. मात्र त्यांना पकडल्यानंतर त्यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न करणे तसेच कट रचने हे दोन वाढीव कलम लावण्यात आले. तसेच त्यांना मदत करणारे दोन साथीदार आशा सहा जणांना वरील गुन्ह्यात अटक केली आहे. या सहाही जणांना  संगमनेर येथील प्रथम वर्ग न्यायालयात उभे केले असता न्यायालयाने त्यांना 14 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT