पारनेर(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे होऊन गेले तरीही पारनेर तालुक्यातील ढवळपुरी येथील दुर्गम भागात आजपर्यंत एसटी महामंडळाची बस (लालपरी) फिरकली नव्हती. आमदार नीलेश लंके यांच्या प्रयत्नातून तालुक्याच्या इतिहासात प्रथमच ढवळपुरी गावच्या वाडीवस्तीवर गुरूवारी लालपरी सुरू झाली आहे. ढवळपुरीतील वाड्यावस्त्यांवरील विद्यार्थी, ग्रामस्थांची आपल्या दैनंदिन कामकाजासाठी तालुक्याच्या व जिल्ह्याच्या ठिकाणी जाण्यासाठी अक्षरश: ससेहोलपट होत होती.
याबाबत आमदार लंके यांचे बंधू दीपक लंके यांनी आगार प्रमुख अमोल कोतकर यांच्याशी वारंवार लेखी व तोंडी स्वरूपात केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले. ढवळपुरीच्या वाडीवस्तीवर प्रथमच गुरूवारी (दि.22) लालपरी सुरू झाली. यावेळी दीपक लंके, पारनेर आगार प्रमुख कोतकर, वाहतूक नियंत्रक संतोष ठुबे, सरपंच नंदा गावडे, सुखदेव चितळकर, भागाजी गावडे, अजित सांगळे, सुरेश रासकर, निवृत्ती थोरात, तुकाराम चितळकर, किरण गव्हाणे, संदीप भागवत, रमेश केदारी, संदीप थोरात, संतोष साळवे यांच्यासह ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
हेही वाचा