अहमदनगर

आवर्तनामुळे खरिपाला जीवदान; आ. राम शिंदेंमुळेच कुकडीचे पाणी

अमृता चौगुले

मिरजगाव(अहमदनगर);पुढारी वृत्तसेवा : ओव्हर फ्लोचे कुकडीचे आवर्तन आमदार राम शिंदे यांच्यामुळे आले. यामुळे कुळधरण परिसरातील खरीप हंगामातील पिकांसाठी वरदान ठरले. याबद्दल शेतकर्‍यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे, अशी माहिती कुळधरणच्या सरपंच प्रभा जगताप यांनी दिली. यावर्षी पावसाने ओढ दिली असून यामुळे खरीप हंगामातील पिके वाया जातात की काय अशी शंका आली होती.

मात्र सध्या सुरू असलेल्या कुकडीच्या आवर्तनामधून कुळधरण परिसरातील सर्व बंधारे, तसेच शेतीसाठी पूर्णवेळ व पूर्ण दाबाने पाणी दिल्याबद्दल आमदार राम शिंदे यांच्या प्रयत्नातून व महसूल मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे, खासदार डॉ. सुजय विखे, जलसंपदा मंत्री चंद्रकांत पाटील आदींच्या सहकार्याने भयानक दुष्काळाची झळ सोसत असलेल्या कुळधरण परिसराला पाणी मिळाले आहे. पिके जळून चालली होती. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याची सुद्धा वाणवा निर्माण होत होती.

परंतु आमदार राम शिंदे यांनी केलेल्या सुचनेनुसार कुकडीच्या सर्व अधिकार्‍यांनी मान्यवरांच्या मार्गदर्शनाने कुळधरण परिसरामधील सर्व बंधारे, तसेच पांडवनगर तलावाचा काही भाग पिंपळवाडी, कोपर्डी परिसरातील शेतीसाठी भरपूर पाणी दिल्याबद्दल सर्वांचे सरपंच प्रभा जगताप यांनी आभार व्यक्त केले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंगेश पाटील, कुळधरणचे पोलिस पाटील समीर पाटील, अमित पाटील, गणेश सुपेकर, नानासाहेब सुपेकर, सुवर्णनाथ जगताप आदी उपस्थित होते.

'जलयुक्त शिवार'मध्ये पाणी साठले'

कर्जत तालुक्यातील कोपरडी येथील जलयुक्त शिवार योजनेच्या झालेल्या कामात पाणी साठले आहे. यामुळे पाणी प्रश्न मिटला आहे.

आमदार राम शिंदे यांनी कुकडीचे आवर्तन 10 सप्टेंबरपर्यंत वाढवले आहे. कुकडीचे पाणी सीना धरणात सोडा, अशी मागणी, आम्ही केली होती. तो शब्द पाळत कुकडीचे पाणी सीना धरणात सोडाले आहे. याबद्दल सीना पट्ट्यात व मिरजगाव भागात समाधान व्यक्त केले जात आहे.

– काकासाहेब तापकीर, सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT