अकोले(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : अल्पवयीन मुलीस लग्नाचे आमिष दाखवून घरातुन पळवून नेत संबंध ठेवल्याप्रकरणी आकाश राजू उघडे (वय 30 रा. विरगाव, ता. अकोले) या नराधमास जेरबंद करण्यात आले. अकोले पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पिडीत अल्पवयीन मुलीच्या 35 वर्षीय आईने अकोले पोलिसात फिर्याद दिली. आकाश उघडे याने अल्पवयीन मुलीस लग्नाचे अमिष दाखवून पळवून नेले.
मुलीचा नातेवाईकांनी शोध घेतला असता, ती विरगाव शिवारात शेतातील घरात सापडली. अल्पवयीन मुलीने सांगितले की, आरोपी घरी यायचा. मला म्हणायचा की, 'तू मला आवडतेस. मी तुझ्याशी लग्न करतो. आपण कुठेतरी जाऊ,' असे अमिष दाखवून या ठिकाणी सहा महिन्यांपूर्वी घेऊन आला.
दरम्यान, आरोपी आकाश उघडे याने अल्पवयीन मुलीशी संबंध ठेवल्याने तिला दिवस गेले आहेत. 'तू तुझ्या आईकडे घरी जायचे नाही. तू आईच्या घरी गेली तर जिवंत सोडणार नाही,' अशी त्याने धमकी दिली. या फिर्यादीवरुन अकोले पोलिसांनी पोस्कोसह अन्य कलमांन्वय्ये गुन्हा दाखल केला आहे. आकाश उघडे यास अटक केली आहे. पुढील तपास पोसई भुषण हांडोरे करीत आहे.
हेही वाचा