अहमदनगर

दर्शना पवार मृत्यूच्या चौकशीची मागणी; फडणवीसांना माजी आ. कोल्हेंचे निवेदन

अमृता चौगुले

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : येथील रहिवासी दत्तात्रय दिनकर पवार यांची मुलगी दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची त्वरित सखोल चौकशी करावी. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन या प्रकरणातील आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करावी, अशी मागणी माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी बुधवारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे प्रत्यक्ष भेटून निवेदनाद्वारे केली आहे.

उपमुख्यमंत्री फडणवीस बुधवारी पुण्यात एका कार्यक्रमासाठी आले असता स्नेहलता कोल्हे यांनी फडणवीस यांना भेटून यासंदर्भात निवेदन देऊन दर्शना पवार हिच्या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करावी, अशी आग्रही मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दर्शना पवार हिच्या मृत्यूची सखोल चौकशी करण्यात येईल व आरोपीवर कडक कारवाई केली जाईल, असे आश्वासन कोल्हे यांना दिले. याप्रसंगी पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, अमर साबळे आदी उपस्थित होते.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT