नगर : पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील 67 हजार 803 शेतकर्यांनी ऑनलाईन खरीप पिकांची सातबारा उतार्यावर नोंदणी केलेली आहे. उर्वरित शेतकर्यांनी दिलेल्या कालावधीत आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. ई-पीक पाहणी हा महसूल विभागाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. 15 ऑगस्ट 2021 पासून हा प्रकल्प संपूर्ण राज्यभरात राबविला जात आहे. ई -पीक पाहणीद्वारे स्वतः शेतकर्यांना स्वतःच्या पिकांची नोंद 7/12 वर घेणे शक्य झाले आहे.
खरीप हंगामासाठीच्या पीक पाहणी नोंदणीसाठी ई-पीक पाहणी व्हर्जन 2 (2.0.11) हे अपडेटेड व्हर्जन गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. सर्व शेतकर्यांनी नवीन व्हर्जन अपडेट करून घेणे आवश्यक आहे. खरीप हंगामाच्या प्रत्यक्ष ई-पीक पाहणी मोबाईलद्वारे पीक पाहणी 1 जुलै 2023 पासून सुरू करण्यात आली. 2 ऑगस्टपर्यंत जिल्ह्यातील 67 हजार 803 शेतकर्यांनी आपल्या खरीप हंगामातील पेरणी झालेल्या पिकांची नोंद केलेली आहे.
शासकीय योजनांच्या लाभासाठी नोंद करा
राज्य शासनाच्या वतीने शेतकर्यांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविल्या जात आहेत. या योजनांचा लाभ घेण्यास अडचण निर्माण होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्वच शेतकर्यांनी खरीप हंगाम-2023 साठी दिलेल्या कालावधीमध्ये आपली ई-पीक पाहणी नोंदणी पूर्ण करणे गरजेचे असल्याचे जिल्हाधिकारी सालीमठ यांनी सांगितले.
तालुकानिहाय ई-पीक नोंदणी
शेवगाव 3433, कर्जत 4935, राहुरी 6537, श्रीरामपूर 3237, अकोले 3626, पाथर्डी 3294, कोपरगाव 7569, जामखेड 2316, राहाता 4513, संगमनेर 3326, श्रीगोंदा 4702, पारनेर 4601, नगर 5631, नेवासा 10083.
हेही वाचा :