अहमदनगर

कर्जत तालुक्यात स्टोन क्रेशरमुळे विकासकामांना गती !

अमृता चौगुले

कर्जत(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : कर्जत तालुक्यातील सुपे शिवारामध्ये अत्याधुनिक असे यादव स्टोन क्रेशर जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती काकासाहेब तापकीर त्रिमूर्ती उद्योग समूहाचे महेंद्र गुंड व उद्योजक दादासाहेब थोरात यांच्या हस्ते सुरू झाले आहे.

कर्जत तालुक्यातील बहिरोबावाडी येथील माजी पंचायत समिती सदस्य व सेवा संस्थेचे अध्यक्ष अंकुशराव यादव यांनी कर्जत तालुक्यातील पहिला अत्याधुनिक स्टोन क्रेशर, यादव स्टोन क्रेशर हा शासकीय नियमाप्रमाणे आज सुरू केला आहे. या स्टोन क्रेशरमुळे कर्जत तालुक्यातील विकास कामांना मोठी गती मिळणार आहे. राजकीय सामाजिक व शासकीय कॉन्ट्रॅक्टर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये उद्घाटन झाले.

यावेळी उद्योजक दीपक शिंदे, उपसभापती अभय पाटील, अशोक खेडकर, सुनील शेलार, बळीराम यादव, दिग्विजय देशमुख, उद्योजक पवार, सतीश दरेकर, अनिल तोरडमल, इंजिनीयर अमित तोरडमल, साहेबराव पांडुळे, सुनील यादव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ म्हणाले की, सन 1992 सालापासून अंकुशराव यादव व मी एकत्र काम करत आहे.

आजही या वयामध्ये त्यांची असणारी जिद्द आणि काम करण्याची वृत्ती ही तरुणांना देखील लाजवणारी आहे. सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत त्यांनी आज ही मोठे यश या ठिकाणी मिळवले आहे. तालुक्यातील पहिला व अतिशय अत्याधुनिक क्रशर त्यांनी या ठिकाणी सुरू केला आहे. कर्जत तालुक्यातील विकास कामांना यामुळे मोठी गती मिळणार आहे.

यावेळी अंकुशराव यादव म्हणाले की, अतिशय अत्याधुनिक आणि मोठा स्टोन क्रशर कर्जत तालुक्यातील सुपे गावाच्या शिवारामध्ये सुरू केला आहे. अतिशय मोठा असा हा क्रशर असून या क्रशरमधून सर्व प्रकारच्या घडीचे उत्पादन अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे. सर्व नागरिकांना योग्य दारामध्ये हवी त्या ठिकाणी खडी यापुढील काळामध्ये मी उपलब्ध करून देणार आहे.

खडीची टंचाई निर्माण झाली तर जादादारांनी विक्री किंवा काही अडचणी या पुढील काळामध्ये नागरिकांना निर्माण होऊ देणार नाही. सर्व शासकीय नियमांचे पालन करून हे स्टोन क्रेशर सुरू केल्या असून त्याच पद्धतीने ते पुढील काळामध्ये सर्व शासनाच्या अटी व शर्ती पाळून चालवले जाईल असे यादव यावेळी म्हणाले. यावेळी महेंद्र गुंड, काकासाहेब तापकीर, व डॉ. मधुकर कार्डाचे यांची भाषणे झाली, सूत्रसंचालन कळस्कर यांनी केले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT