नेवासा(पुणे); पुढारी वृत्तसेवा : नेवासा फाटा येथून चोरीस गेलेली बोअरची गाडी पोलिसांनी थेट तामिळनाडू येथे जाऊन ताब्यात घेतली आहे. नेवाशाचे पोलिस निरिक्षक शिवाजीराव डोईफोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक एस.जी. ससाणे, मनोज मोंढे व कर्मचारी शाम गुंजाळ, राम वैद्य यांनी ही कारवाई केली.
नेवासा फाटा येथील विष्णू श्रीरंग निपुंगे यांच्या मालकीची 35 लाख रूपये किमतीची बोअरवेलची गाडी (के.ए 01 एमएफ 1516) चालक मिस्टर मुरुगेशन गोविंदन याने न सांगता पळवून नेली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला होता. गुन्हा दाखल होताच नेवासा पोलिसांनी तपास करत तामिळनाडू येथे जाऊन गाडी जप्त केली.
हेही वाचा