नगर : पुढारी वृत्तसेवा : बोल्हेगाव उपनगराचा भाग असलेल्या संस्कृतीनगरमध्ये जाण्या-येण्यासाठी रस्ताच नसल्याने परिसरात राहणार्या नागरिकांचे प्रचंड हाल होत आहे. पावसाळ्यात तर त्यांना मोठी कसरत करावी लागत असून, चिखल तुडवत वाट काढावी लागते. या रस्त्याच्या प्रश्नाकडे नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. संस्कृतीनगरमध्ये गेल्या सहा वर्षापासून सुमारे 70 ते 80 कुटूंब राहत असून त्यांच्या दररोजच्या दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे.
संस्कृतीनगरवरून जाणारा रस्त्यावर घुले पाटील कॉलेज असून पुढे हाच रस्ता मनमाड रस्त्याला जोडला जातो. नगर शहरात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो. गेल्या सहा वर्षापासून या रस्त्यावर साधा मुरूम देखील टाकला नाही. या परिसरात राहणारे नागरिकांना जाण्या-येण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शाळेत जाणारे मुलांचे हाल होत आहे. पावसाळ्यात रस्त्यावर चिखळ तयार झाल्याने पायी चालने देखील कठीण होते. दरम्यान, या रस्त्यासाठी स्थानिक नगरसेवकांसह महापालिका प्रशासनाने लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.
..तर आंदोलन करू!
नगरसेवक कुमार वाकळे यांनी वार्डामध्ये रस्त्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी आणि नवीन रस्त्यांसाठी पुढाकार घेतला आहे. वार्डामध्ये नवीन रस्ते विकसित झालेले आहेत. परंतु संस्कृती नगर मधील रहिवाशांना रस्ता नसल्याने जीने मुश्किल झाले आहे. रस्त्याबाबत पालिका प्रशासनाने रस्ता करून न दिल्यास आंदोलन करण्याची भूमिका नागरिकांनी घेतली आहे.
हेही वाचा :