अहमदनगर

Nagar News : गुणरत्न सदावर्तेंचा पुतळा जाळला

अमृता चौगुले

पाथर्डी तालुका : पुढारी वृत्तसेवा :  तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने अ‍ॅड गुणरत्न सदावर्ते यांचा पुतळा जाळण्यात आला. मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील यांना अटक करावी, अशी मागणी अ‍ॅड सदावर्ते यांनी केल्याने संतप्त सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गुरुवारी शहरातील डॉ.आंबेडकर चौकात सदावर्ते यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळण्यात आला.
यावेळी उद्धव माने, अप्पासाहेब बोरुडे, विवेक देशमुख, अमोल पाठक, सोमनाथ माने, दीपक मोरे, अंकुश चितळे, लाला शेख, देवा पवार, मेजर मोरे उपस्थित होते.

मराठा समाजासाठी मनोज जरांंगे पाटील यांनी जीवाची बाजी लावली आहे. ते संविधानाने घालून दिलेल्या न्याय हक्काच्या मागणीसाठी त्यांचे विविध मार्गाने उपोषण सुरू आहे. असे असताना त्यांच्या अटकेची मागणी करणारे सदावर्ते यांचा जाहीर निषेध करीत आहोत, अशा शब्दात कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केल्या. मनोज जरांगे झिंदाबाद, सदावर्ते मुर्दाबाद, डॉ. आबेंडकरांचा विजय असो, अशी घोषणाबाजी यावेळी करण्यात आली. मराठा आरक्षणाचे पुरस्कर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याविरुद्ध सदावर्ते गरळ ओकत आहेत. त्यांना गप्प करा, अन्यथा त्यांच्याच पद्धतीने त्यांना जनता उत्तर देईल. सदावर्तेंना रस्त्यावर फिरता येणार नाही, असा इशारा युवकांनी दिला.

हे ही वाचा :

SCROLL FOR NEXT