गंगापूर (औरंगाबाद ), पुढारी वृत्तसेवा : शासनाने विक्रीसाठी बंदी घातलेला तसेच खाण्यासाठी घातक असलेल्या मांगूर जातीचे मासे विनापरवाना वाहतूक सुरू होती. ही वाहतूक करण्या-या ट्रकला गंगापूर पोलिसांनी ताब्यात घेवून त्यात असलेले मांगूर जातीचे दोन टन मासे मत्स्य आयुक्तांच्या व महसूल प्रशासनाच्या मदतीने नष्ट केले. ही कारवाई सोमवारी (दि. ५) सायंकाळी सहा वाजेदरम्यान नगर पालिका कचरा विघटन मैदानावर करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा हद्दीतील गोदावरी पात्रातून मांगूर जातीचे एक टन मासे विनापरवाना ट्रकद्वारे ( एम.पी.०९ जी.एच.०९६०) आंध्र प्रदेश राज्यात जाणार आल्याची माहिती गंगापूर पोलिसांना मिळाली. ३ सप्टेंबर रोजी रात्री १० च्या सुमारास अहमदनगर- औरंगाबाद मार्गावर भेंडाळा परिसरात पोलिसांनी हा ट्रक ताब्यात घेवून तो ठाण्यात आणला.
या घटनेची माहिती जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण, व मत्स्यव्यवसाय औरंगाबादच्या प्रादेशिक उपायुक्त हृता दिक्षित यांना पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी माहिती दिली. गंगापूर येथील नगरपरिषदच्या कचरा डेपोमध्ये जेसीबीच्या साह्याने संपूर्णपणे मत्स्यसाठा नष्ट करण्यात आला. या प्रकरणी चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलीसांनी सांगितले.
हेही वाचा