वाळकी (नगर ) : पुढारी वृत्तसेवा : जत्रेनिमित्त नातेवाईकाकडे आलेल्या चौदा वर्षीय अल्पवयीन मुलीवर एका तरूणाने अत्याचार केल्याची घटना नगर तालुक्यातील गावात घडली. पोलिसांनी या तरूणाला अटक केली असून, त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे. संबंधित पीडित मुलगी पारनेर तालुक्यातील एका गावातील रहिवासी असून, नगर तालुक्यातील एका गावात तिचे नातेवाईक आहेत. ही मुलगी दि.7 एप्रिल रोजी जत्रेनिमित्त नातेवाईकांकडे आली होती.
तेथे अक्षय विजय वाळके (रा. घोसपुरी, ता.नगर) या तरूणाने ओळखीचा गैरफायदा घेत रात्रीच्या वेळी तिच्यावर अत्याचार केला. तसेच त्यानंतर तू कोणास काही एक सांगितले, तर तुला ठार मारील, अशी धमकी दिली. या प्रकाराने पीडित मुलगी घाबरली. तिने हा प्रकार कोणालाही सांगितला नाही. त्यानंतर आरोपी वाळके हा तिला नेहमी फोन करून भेटायला बोलावू लागला. तिच्या गावात जाऊन तिच्या घरी चकरा मारून त्रास द्यायला लागला.
या त्रासाला कंटाळून काही दिवसांपूर्वी तिने घडलेला प्रकार तिच्या आजीला सांगितला. तिच्या कुटुंबीयांनी आरोपी वाळके यास समजावून सांगूनही तो फोन करण्याचे व त्रास देण्याचे बंद झाला नाही. त्यामुळे सदर पीडित मुलीने नगर तालुका पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी आरोपी अक्षय विजय वाळके याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक शिशिरकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण यांनी आरोपीस अटक करून न्यायालयासमोर हजर केल्यावर त्याची रवानगी कोठडीत करण्यात आली आहे.
हे ही वाचा :