पुणे : नॅक मूल्यांकन नसेल तर प्रवेश थांबवा ! कुलगुरू डॉ. गोसावी यांचे आदेश

पुणे : नॅक मूल्यांकन नसेल तर प्रवेश थांबवा ! कुलगुरू डॉ. गोसावी यांचे आदेश

पुणे : नॅक मूल्यांकन ही अनिवार्य प्रक्रिया असूनही राज्यातील अनेक महाविद्यालयांनी एकदाही नॅक मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून घेतलेले नाही. अशा महाविद्यालयांनी विद्यापीठाच्या पूर्वपरवानगीशिवाय 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रथम वर्षाचे प्रवेश करू नयेत, असे स्पष्ट आदेश सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने दिले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी यांनी शिस्तीचे हत्यार उपसले आहे.

सावित्रीबाई फुले विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी काढलेल्या पत्रकात इशारा दिला आहे की, मूल्यांकन ही अनिवार्य प्रक्रिया असूनही मूल्यांकन, पुनर्मूल्यांकन करून घेतले नसल्याचे उघड झाले आहे. राज्याच्या उच्च शिक्षण संचालकांनी बजावलेल्या आदेशानुसार संबंधित महाविद्यायांची संलग्नता रद्द करण्याचे निर्देश दिले असून 25 मे रोजीच संलग्न महाविद्यालयांना या बाबतची सूचना देण्यात आलेली आहे.

महाविद्यालयांनी मूल्यांकन प्रक्रियेसंदर्भातील माहिती विद्यापीठ प्रशासनाला सादर करण्याबाबत स्पष्ट केले होते. मात्र महाविद्यालयांनी अद्याप मूल्यांकन करून घेतलेले नाही. त्यानंतर आता विद्यापीठाकडून प्रथम वर्षाचे प्रवेश न करण्याबाबत आदेश देण्यात आले. प्रवेश प्रक्रिया केल्यास त्याची जबाबदारी संस्था, प्राचार्य, संचालक, महाविद्यालयांची असणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आलेले आहे.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news