अहमदनगर

नेवासा : कल्याण येथून चोरलेले चारचाकी वाहन पकडले

अमृता चौगुले

नेवासा (नगर ) : पुढारी वृत्तसेवा :  कल्याण येथून चोरून आणलेली टाटा एस कंपनीची चारचाकी गाडी नेवासा पोलिसांनी खडका फाटा येथील टोलनाक्याजवळ मोठ्या शिताफीने पकडली. चोरासह ही गाडी कल्याण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आली. कल्याण पोलिस ठाण्यातील चोरीच्या गुन्ह्यातील टाटा एस कंपनीची गाडी (एमएच 47 एएस 0611) खडका टोलनाका नेवासा येथून पास झालेली आहे, अशी माहिती गुरूवारी (दि.10) रात्री 10 वाजता नेवासा पोलिस ठाण्याचे निरीक्षक शिवाजीराव डोईफोडे यांना कल्याण पोलीस ठाण्यातून मिळाली. त्यांनी तात्काळ पोलिस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाणे, पोलिस कर्मचारी किरण गायकवाड, सुमित करंजकर, शाम गुंजाळ या पथकाला हे वाहन पकडण्यासाठी खडका टोलनाका येथे पाठविले.

सदर वाहन पथकास खडका टोलनाक्याजवळ एका चहाच्या टपरीसमोर उभे असलेले दिसले. पोलिस पथक वाहनाच्या जवळ गेले असता, वाहनचालक पोलिसांना पाहून पळून जाऊ लागला. पोलिसांनी पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव अन्वर लतीफ मन्सुरी (रा.श्रीरामपूर) असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर चालकासह वाहन पोलिस ठाण्यात आणून कल्याण तालुका पोलिसांना माहिती देण्यात आली. हे वाहन त्यांच्या ताब्यात देण्यात आले.

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT