अहमदनगर

जिल्ह्यातील 29 गावं सुंदर ! पालकमंत्री विखे पाटलांच्या हस्ते उद्या पुरस्कार वितरण

अमृता चौगुले

नगर : पुढारी वृत्तसेवा :  जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत विभागामार्फत घेण्यात आलेल्या 'आर. आर. (आबा) पाटील सुंदर गाव स्पर्धेतून 29 ग्रामपंचायतींची पुरस्कारासाठी निवड झालेली आहे. तसेच मागील चार वर्षांतील 55 ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. महसूल, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते उद्या रविवारी सकाळी 11 वाजता, बंधन लॉन येथे पुरस्कार वितरण होणार आहे.

मध्यंतरीच्या कोरोना काळामुळे चार वर्षे आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्रदान केलेले नव्हते. तसेच सुंदर गाव पुरस्काराचे वितरणही बाकी होते. मात्र मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी हा कार्यक्रम घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार उद्या रविवारी हा कार्यक्रम होणार आहे. येरेकर यांच्यासह अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तर उपमुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शेळके तसेच समर्थ शेवाळे यांच्या नियोजनाखाली पार पडत आहे. यावेळी लोकसभा सदस्य, विधानसभा सदस्य, विधानपरिषद सदस्य, माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.

आदर्श ग्रामसेवक पुरस्कार जाहीर

2018-19 : राणीकुमार वाळे, सुनील राजपूत, प्रतीभा पागिरे, हितेश ढुमणे, संदीप शेटे, सतिश मोटे, संपत गोल्हार, कुमार गणगे, किशोर टकले, अनिल भोईटे, तानाजी पानसरे, सुनील दुधाडे, सचिन थोरात,

2019-20 : एकनाथ ढाकणे, विशाल काळे, कृष्णदास अहिरे, रवींद्र बोर्से, प्रदीप आसणे, रामदास कार्ले, आसाराम कपिले, भैय्यासाहेब कोठुळे, दीलीप नागरगोजे, नीलेश टेकाळे, उजाराणी शेलार, वैशाली बोरुडे, संगीता देठे, भाऊसाहेब पालवे.

2020-21 : गौतम जानेकर, रमेश भालेराव, अविनाश पागिरे, सुधीर उंडे, मधुकर दहिफळे, गणेश पाखरे, नसिम सय्यद, शिवाजी फुंदे, गोपीचंद रोढे, नंदा डामसे, प्रताप साबळे, संदीप लगड, शशिकांत नरोडे, स्वाती घोडके.

2021-22 : संजय दुशिंग, सुनील नागरे, योगेश देशमुख, शशिकांत चौरे, सुप्रिया शेटे, वनिता कोहकडे, महेश शेळके, सोपान बर्डे, राजेंद्र साखरे, रामदास गोरे, ललिता बोंद्रे, अर्जुन साबळे, सारिका मेहेत्रे, प्रियंका भोर.

आर.आर. आबा सुंदरगाव पुरस्कार

2020-21 : विरगाव, वेल्हाळे, संवत्सर, बाभळेश्वर, उंदिरगाव व बेलापूर बु., तांदूळनेर, खुपटी, वडुले बु., येळी, मोहरी, थेरगाव, निमगाव खलू, मांडवे खुर्द, कोल्हेवाडी.
2021-22ः विठा, आश्वी बु, सडे, लोहगाव, ब्राम्हणगाव वेताळ, दवणगाव, खामगाव, दहिगावने, करंजी, फक्राबाद, खांडवी, मुंगुसगाव, हत्तलखिंडी, वडगाव गुप्ता.
2020-21ः जिल्हास्तरीय पुरस्कार- संवत्सर व थेरगाव
2021-22 : जिल्हास्तरीय पुरस्कार- आश्वी व वडगाव गुप्ता

 हे ही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT