अहमदनगर

कोपरगाव : गोदावरीत 16355 क्यूसेक विसर्ग सोडला

अमृता चौगुले

कोपरगाव(अहमदनगर); पुढारी वृत्तसेवा : नांदूरमधमेश्वर बंधार्‍यातून गोदावरी नदी पात्रात (28 जुलै) रोजी सायंकाळी 7 वाजता 4469 क्यूसेक पाण्याचा विसर्ग वाढवून रात्री 10 वाजता 16, 355 क्यूसेक केल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान, नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर परिसरासह गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात संततधार सुरू असल्याने गंगापूर धरण 70 टक्के भरले आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास पाण्याचा विसर्ग वाढविणार असल्याचे सांगण्यात आले.

कोपरगावला अद्याप पावसाची प्रतिक्षा कायम आहे. जुन, जुलै पावसाचे हे मुख्य दोन महिने संपले तरी कोपरगावकरांवर पाऊस रूसला आहे. बळीराजा दररोज सकाळी उठून आभाळाकडे टक लावून पहात आहे. पंजाबराव डख व हवामान खात्याच्या बातमीकडे त्याचे कान आसुसलेले आहेत. पाऊस पडावा यासाठी देवाला साकडे घालत आहे. कोपरगावला पावसाची प्रतिक्षा कायम आहे. दरम्यान, नांदुर मध्यमेश्वर बंधार्‍यातुन गोदावरी नदीतुन 1 जून ते 28 जुलै पर्यंत 2,355 दशलक्ष घनफुट पाणी जायकवाडी धरणाकडे वाहिले. कोपरगावमध्ये आत्तापर्यंत 123 मिलि मीटर पाऊस पडल्याचे सांगण्यात आले.

कोपरगावमध्ये पडलेला पाऊस मिलीमीटरमध्ये !

दारणा 40 (473), मुकणे 60 (519), वाकी 70 (884), भाम 60 (1133), भावली 156 (2145), वालदेवी 47 (240), गंगापुर 50 (550), काश्यपी 45 (453), गौतमी 80 (643), नांदुरमध्यमेश्वर 4 (83), नाशिक 16 (255), इगतपुरी 136 (1888), त्रंबकेश्वर 100 (801), देवगाव 7 (167), ब्राम्हणगाव 0(157), कोपरगांव 0 (123), पढेगाव 0(74), सोमठाणे 0 (69), कोळगांव 5 (143), सोनेवाडी 5 (138), शिर्डी 7 (97), राहाता 7(149), रांजणगांव खुर्द 13 (136), चितळी 24 (90) असा आहे. गोदावरी नदीत 16, 355 क्युसेस विसर्ग सुरू आहे. पाणी कोपरगावी येण्यास 12 तास लागतील.

दरवाजांची चाचपणी

मुळा धरणाच्या दरवाज्यातून पाणी सोडण्यापूर्वी दरवाज्यांची चाचपणी यशस्वी झाली आहे. धरण साठा निम्म्यावर असतानाच मुळा पाटबंधारे विभागाने सर्व दक्षता बाळगली आहे. आवक व विसर्गाबाबत मुळा पाटबंधारेचे नियोजन झाल्याचे शाखाभियंता पारखे यांनी 'पुढारी' ला सांगितले.

हेही वाचा

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT