Latest

Ajit Pawar : लोकसभेसाठी अजित पवार गटाकडून सहा नवे चेहरे

दिनेश चोरगे

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांची राजकीय प्रतिष्ठा पणाला लागल्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी या पक्षाकडून सहा नवे चेहरे मैदानात उतरवले जाणार आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांच्याविरुद्ध मुलगा पार्थ किंवा पत्नी सुनेत्रा यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविण्याचा विचारही अजित पवार करीत असल्याचे वृत्त आहे.

विधान परिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, पार्थ किंवा सुनेत्रा अजित पवार, सहकारमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार सतीश चव्हाण आणि माजी मंत्री दिलीप सोपल यांना लोकसभेच्या मैदानात उतरविले जाण्याची शक्यता आहे. शिरूरमध्ये अजित पवार गटाने सहकारमंत्री वळसे-पाटील आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांना पसंती दिली आहे. वळसे यांनी नकार दिल्यास आढळरावांना आखाड्यात उतरविले जाणार आहे. शरद पवारांचा सातारा हा किल्ला भेदण्यासाठी अजित पवार गटाने रामराजे नाईक-निंबाळकर यांना पसंती दिली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार सतीश चव्हाण यांना तयारी करण्याच्या सूचनाही पक्षाने दिल्याचे समजते.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT