Latest

Maharashtra Political Crisis | “भारताचा इतिहास सांगतो…” शरद पवारांच्या निवासस्थानाबाहेरील पोस्टर्स चर्चेत

सोनाली जाधव

पुढारी ऑनलाईन डेस्क : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह सरकारमध्ये सामील झाले. अजित पवार यांनी रविवारी (दि. २) उपमुख्यमंत्री पदाची शपथ (Ajit pawar latest) घेतली. या घडमोडीमुळे राज्याच्या राजकारणासह महाविकास आघाडीत राजकीय उलथापालथ झाली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोस्टर्स लावण्यात आले आहे. त्यावर लिहिण्यात आले आहे की, 'भारताचा इतिहास असा आहे की ज्यांनी विश्वासघात केला त्यांना कधीही माफ केले नाही'. ही पोस्टर्स सोशल मीडियावरही व्हायरल झाली आहेत. (Maharashtra Political Crisis )

Maharashtra Political Crisis : …त्यांना कधीही माफ केले नाही

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवासस्थानाबाहेर पोस्टर्स लावण्यात आले आहे. या पोस्टरवर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया दुहान, धीरज शर्मा यांच्यासह शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो आहेत. त्याचबरोबर या पोस्टरवर हिंदीमध्ये लिहण्यात आले आहे. त्याचा आशय असा की,  "सत्य-असत्याच्या लढाईत संपूर्ण देश शरद पवारांच्या पाठीशी आहे' आणि 'भारताचा इतिहास असा आहे की ज्यांनी विश्वासघात केला त्यांना कधीही माफ केले नाही'.

त्याचबरोबर राष्ट्रवादी विद्यार्थी कॉंग्रेसने 'बाहुबली' चित्रपटातील एका दृश्यावर डिझाईन केलेले पोस्टर लावले आहे, त्यामध्ये पात्र 'कटप्पा' 'अमरेंद्र बाहुबली'च्या पाठीत वार करत आहे. या पोस्टरवर लिहण्यात आले आहे की,""आपल्यात लपलेल्या गद्दारांना सारा देश पाहत आहे. जनता माफ करणार नाही. अशा खोट्या मूर्खांना". या पोस्टरवर गद्दार हॅशटॅग दिला आहे.

शरद पवार दिल्लीला रवाना

महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध राष्ट्रवादीच्या पेचप्रसंगाच्या पार्श्वभूमीवर शरद पवार आणि अजित पवार यांनी काल मुंबईत पक्षाच्या दोन वेगवेगळ्या बैठका बोलावल्या होत्या. आज पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होणार आहे. शरद पवार हे त्यांच्या मुंबईमधील निवासस्थानावरून दिल्लीला रवाना झाले आहेत. दरम्यान, नवी दिल्ली नगरपरिषदेने शरद पवार यांचे पोस्टर्स आणि होर्डिंग्स काढले आहेत. (Maharashtra Political Crisis)

हेही वाचा 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT