मुंबई; पुढारी ऑनलाईन : निवडणूक आयोगाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव दिल्यानंतर राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. २७ फेब्रुवारीपासून विधिमंडळाचे राज्यस्तरीय अधिवेशन सुरू होत आहे, या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ विस्तार (Maharashtra Cabinet expansion) केला जावा, असा दबाव एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. पण आताच मंत्रिमंडळ विस्तारासाठी भारतीय जनता पक्षा फारसा उत्सुक नसल्याचे सांगितले जाते. याबाबतचे वृत्त द टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्यानंतर शिंदे गटाने राजकीय बाजी मारली आहे. जर आता मंत्रिमंडळ विस्तार केला तर आमदारांचा मुख्यमंत्री शिंदे यांच्यावरील विश्वास अधिक बळकट होईल, असे सांगितले जाते.
शिंदे गटात ४० आमदार आहेत. शिवाय १० अपक्ष आमदारांचा पाठिंबा शिंदे यांना आहे. पण यातील फक्त ९ आमदारांना मंत्रिपद मिळाले आहे. शिंदे गटातील १४ आमदारांनी मंत्रिपदावर दावा सांगितला आहे.
राज्यातील भाजप, शिवसेना नेत्यांची केंद्रातील भाजपच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतरच मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळणार आहे. म्हणजेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी हिरवा झेंडा दाखवल्यानंतरच राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे.
सत्ता हाती घेतल्यानंतर ४० दिवसांनी म्हणजे ९ ऑगस्टला मंत्रिमंडळ विस्तार होऊन १८ कॅबिनेट मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश कऱण्यात आला. यात राज्यमंत्रीपदावर कुणालाही संधी देण्यात आलेली नाही. शिंदे यांना पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांपैकी एकालाही मंत्रिमंडळात संधी देण्यात आलेली नाही. (Maharashtra Cabinet expansion)
हे ही वाचा :