नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : चारशे कोटी रुपयांच्या हवाला प्रकरणी रियल इस्टेट क्षेत्रातील प्रसिध्द समूह एम 3 एमचे प्रवर्तक रुप बन्सल यांना सक्तवसुली संचलनालयाने अटक केली आहे. अलिकडेच बन्सल यांच्याशी संबंधित दिल्ली आणि गुरुग्राम येथील ठिकाणांवर ईडीने छापेमारी केली होती.
गुंतवणुकदारांकडून आलेला पैसा इतरत्र वळविणे, त्याचा दुरुपयोग करणे व तो हडप करणे अशा स्वरुपाचे गंभीर आरोप रुप बन्सल यांच्याविरोधात आहेत. एम 3 एम आणि आयआरईओ या समुहावर ईडीकडून कारवाई करण्यात आली आहे. आयआरईओ समुहावर याआधीच फसवणुकीचे असंख्य गुन्हे दाखल आहेत.
आयआरईओ समुहाकडून बनावट कंपन्यांच्या मार्फत एम 3 एम समुहाला चारशे कोटी वळविण्यात आल्याचे ईडीच्या तपासात आढळून आले आहे. सर्व बनावट कंपन्या रुप बन्सल आणि बसंत बन्सल यांच्याकडून तयार करण्यात आलेल्या होत्या व चालविण्यातही येत होत्या.
.हेही वाचा