मुंबई: झवेरी बाजार परिसरातील ५ मजली इमारतीला भीषण आग | पुढारी

मुंबई: झवेरी बाजार परिसरातील ५ मजली इमारतीला भीषण आग

मुंबई: पुढारी वृत्तसेवा : मुंबईतील झवेरी बाजार परिसरात शुक्रवारी पहाटे २ च्या सुमारास एका ५ मजली इमारतीला आग लागली. यात एक जण जखमी झाला आहे. तर ५० हून अधिक जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या १२ बंब घटनास्थळी दाखल झाले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे.

मुंबईच्या झवेरी बाजार परिसरातील इमारतीला भीषण आग लागली. इमारतीत अडकलेल्या सर्व लोकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे. आतापर्यंत कोणतीही दुखापत किंवा जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा 

Back to top button