प्रातिनिधिक छायाचित्र. 
Latest

काय सांगता! भारतात लवकरच सुरु होणार ‘अंतराळ पर्यटन सेवा’

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारतीयांसाठी आता लवकरच अंतराळात पर्यटनाची सेवा उपलब्‍ध होणार आहे. अमेरिकेतील SpaceVIP ही कंपनी पुढील महिन्यात भारतात पदार्पण करणार असून, 'लक्झरी स्पेस ॲडव्हेंचर'  (luxury space adventure) ही सेवा सुरू करणार आहे. आपल्या ग्राहकांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर (ISS) घेऊन जाणारी ही जगातील एकमेव कंपनी आहे.

'चांद्रयान-३' च्या यशानंतर भारतीयांच्‍या अंतराळ कुतूहलात लक्षणीय वाढ

न्यू यॉर्कमध्ये मुख्यालय असलेल्या SpaceVIP ही कंपनी अतंराळातील विलक्षण प्रवास अनुभव आणि इव्हेंट्ससाठी ओळखली जाते. या कंपनीद्वारे भारतीय ग्राहक मंगळ, चंद्र आणि आंशिक गुरुत्वाकर्षणाचा अनुभव घेऊ शकतील. चांद्रयान-३ च्या यशानंतर भारतीयांच्‍या अंतराळासंदर्भातील कुतूहलात लक्षणीय वाढ झाली आहे. अवकाश पर्यटनाचा वाढता कल पाहता कंपनी आता भारतात ही सेवा सुरू करणार आहे. ग्राहकांना इंटरनॅशनल स्पेस स्टेशन (ISS) वर घेऊन जाण्याचीही कंपनीची योजना आहे. "पहिल्यांदाच या लक्झरी सेवा भारतातील ग्राहकांसाठी उपलब्ध असतील," असे कंपनीने एका निवेदनात नमूद केले आहे. (luxury space adventure)

SpaceVIP चे लक्ष भारतीय बाजारपेठेकडे

रोमन चिपोरुका आणि एडी मिलर यांनी २०२१ मध्‍ये SpaceVIP कंपनीची स्थापना केली. भारतीय अंतराळ संशोधन संस्‍थेने (इस्‍त्रो) चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर राबवलेली चांद्रयान-3 मोहिम यशस्‍वी ठरली. यानंतर सूर्याच्या सर्वात बाहेरील थरांकडे आदित्य-L1 चे नुकतेच प्रक्षेपण केले आहे. भारतीयांची अंतराळ संबंधीचे कुतूहल पाहून कंपनीने आता आपले लक्ष भारतीय बाजारपेठेकडे वळवले आहे. अंतराळ शिक्षण आणि संशोधन भारताच्या अलीकडील कामगिरीवर कंपनी बारकाईने लक्ष ठेवून आहे, असे कंपनीने 'टाईम्‍स ऑफ इंडिया'शी बोलताना सांगितले.

भारत सरकारही अंतराळ प्रवासात खासगी उद्योग आणण्याचा विचार करत आहे. भारतीय दूरसंचार, नेव्हिगेशन आणि पृथ्वी निरीक्षण यांसारख्या उपग्रह-आधारित सेवांच्या मागणीमुळे अंतराळ उद्योग 2025 पर्यंत USD 50 अब्जपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT