Latest

Money laundering : शस्त्रास्त्र व्यापारी ‘भंडारी’ला भारतात प्रत्यार्पणाचे लंडन न्यायालयाचे आदेश, मनीलाँड्रिंग व करचुवकवेगिरी प्रकरण

backup backup

पुढारी ऑनलाइन डेस्क : Money laundering : मनीलाँड्रिंग आणि करचोरीचा आरोप असलेला आणि लंडन स्थित शस्त्रास्त्र व्यापारी 'संजय भंडारी' याला भारतात प्रत्यार्पणाचे आदेश लंडन न्यायालयाने दिले आहे. भंडारी यांचे प्रकरण पुढील प्रक्रियेसाठी देशाच्या गृहसचिवांकडे पाठवण्यात आले आहे.

Money laundering : भारतीय अधिका-यांनी लंडनकडे भंडारीच्या प्रत्यार्पणासाठी दोनदा विनंती केली होती. आरोपी व्यापारी संजय भंडारी हा 60 वर्षीय असून शस्त्रास्त्रांचा व्यापार करतो. त्याच्यावर करचुकवेगिरी आणि शस्त्रास्त्रांच्या व्यवहारात किकबॅकशी संबंधित अनेक प्रकरणांमध्ये आरोप आहेत. भारताच्या पत्यार्पणाच्या विनंतीनंतर भंडारी याने लंडन न्यायालयात धाव घेतली होती.

Money laundering : या वर्षाच्या सुरुवातीला लंडनमधील वेस्टमिन्स्टर मॅजिस्ट्रेट कोर्टात खटल्याची सुनावणी घेण्यात आली. जिल्हा न्यायाधीश मायकल स्रो यांनी कोणत्याही प्रतिबंधाशिवाय प्रत्यार्पणाच्या आदेशासाठी यूकेच्या गृह सचिव सुएला ब्रेव्हरमन यांच्याकडे हे प्रकरण पाठवण्याचा निर्णय घेतला.

भंडारीच्या यांच्या भारत सरकारच्या प्रत्यार्पणाच्या विनंतीला यूकेच्या तत्कालीन गृहसचिव प्रिती पटेल यांनी जून 2020 मध्ये प्रमाणित केले होते आणि त्याच वर्षी पुढील महिन्यात प्रत्यार्पण वॉरंटवर त्यांना अटक करण्यात आली होती.

भंडारी यांच्यावर 2015 मध्ये त्यावेळी कराच्या उद्देशाने भारतात वास्तव्यास असलेल्या भंडारी यांच्यावर परदेशातील मालमत्ता लपविल्याचा, बॅकडेटेड कागदपत्रांचा वापर केल्याचा भारतीय कर अधिका-यांना घोषित न केलेल्या मालमत्तेचा फायदा मिळवून दिल्याचा आणि नंतर त्याच्याकडे कोणतीही मालमत्ता नसल्याची अधिका-यांना खोटी माहिती दिल्याचा आरोप आहे.

Money laundering : लंडनस्थित व्यावसायिक भंडारीने केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) आणि अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कडून त्याच्याविरुद्धच्या खटल्यांवर प्रत्यार्पणासाठी लढा दिल्याने कोर्टात प्रदान केलेल्या सुरक्षेवर जामिनावर आहे आणि सोमवारी न्यायदंडाधिकारी न्यायालयात अपील करण्याची अपेक्षा आहे.

Money laundering : न्यायालयीन कागदपत्रांनुसार, भंडारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए) 2002 च्या विरुद्ध मनी लाँडरिंगच्या गुन्ह्यासाठी आणि काळ्या पैशाच्या (अघोषित परकीय उत्पन्न आणि मालमत्ता) विरूद्ध करचुकवेगिरीच्या गुन्ह्यांसाठी अभिप्रेत खटला चालवण्यासाठी भारतात हवा आहे.

हे ही वाचा :

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT