Latest

Lok Sabha Elections 2024 : तुमच्या लोकसभा उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही ना? या ॲपद्वारे तपासा

मोहन कारंडे

पुढारी ऑनलाईन डेस्क : लोकशाहीचे उगमस्थान तसेच जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताच्या लोकसभा निवडणुकीचा (Lok Sabha Elections 2024) बिगुल अखेर वाजला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शनिवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर देशभरातील राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाकडूनही तयारी सुरू असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोगाने एक ॲप लाँच केले आहे, ज्याद्वारे आपल्याला उमेदवाराची गुन्हेगारी पार्श्वभूमी तपासता येईल.

मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हे मोबाईल ॲप सादर केले आहे. या ॲपचे नाव Know Your Candidate (KYC) असे आहे. हे ॲप मतदारांसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. त्याच्या मदतीने, वापरकर्ते त्यांच्या लोकसभा उमेदवाराची माहीती तपासू शकतात शिवाय त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी शोधू शकतात. (Lok Sabha Elections 2024)

या मोबाईल ॲपच्या मदतीने मतदार त्यांच्या लोकसभा जागांसाठीच्या सर्व उमेदवारांची यादी तपासू शकतात. तसेच त्यांची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असेल तर तेही तपासता येईल. ॲप लाँच करताना मुख्य निवडणूक आयुक्त कुमार म्हणाले की, आपल्या मतदारसंघातील उमेदवाराची गुन्हेगारी इतिहास जाणून घेणे हा मतदारांचा अधिकार आहे.

Lok Sabha Elections 2024 : देशातील मतदानाचे 7 टप्पे

1) 19 एप्रिलला पहिल्या टप्प्याचे मतदान, 102 जागा.
2) 26 एप्रिलला दुसर्‍या टप्प्याचे मतदान, 89 जागा.
3) 7 मे रोजी तिसर्‍या टप्प्याचे मतदान, 94 जागा.
4) 13 मे रोजी चौथ्या टप्प्याचे मतदान, 96 जागा.
5) 20 मे रोजी पाचव्या टप्प्याचे मतदान, 49 जागा.
6) 25 मे रोजी सहाव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा.
7) 1 जूनला सातव्या टप्प्याचे मतदान, 57 जागा.

Lok Sabha Elections 2024 : हेही महत्त्वाचे…

– 1 एप्रिलपर्यंतची मतदारयादी अद्ययावत.
– मतदाराने निवडणूक आयोगाकडे तक्रार केल्यानंतर 100 मिनिटांत दखल घेणार.
– उमेदवाराला गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्यास तसे नमूद करावे लागेल.
– एकूण 1.5 कोटी कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत तैनात असतील.
– लोकसभा निवडणुकीत अफवा रोखण्यासाठी विशेष उपाययोजना, हिंसाचार रोखण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष.
– सर्व विमानतळांवर तपासणी होणार. सर्व चार्टर्ड विमानांचीही तपासणी होणार.
– हेलिकॉप्टर लँड झाल्यानंतर तपासणी होईल.
– राजकीय पक्षांनी सोशल मीडिया जबाबदारीने वापरण्याचा निवडणूक आयोगाचा सल्ला.
– निवडणूक यंत्रणा प्रत्येक मतदान केंद्रावर पोहोचणार.
– बँकांना पैशाचे ताळेबंद द्यावे लागतील.
– खोट्या बातम्यांविरुद्ध तातडीने कारवाई होणार, याबद्दल जागरूक राहण्याचे आवाहन.
– जात, धर्माच्या आधारावर प्रचार होणार नाही.
– राजकीय पक्षांनी स्टार प्रचारकांच्या याद्या बनवून ठेवाव्यात.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT