Rajasthan New CM Update 
Latest

BJP Lok Sabha Seat : भाजपच्या पहिल्या यादीत नवोदितांना संधी, सुषमा स्‍वराज यांच्‍या कन्‍येला उमेदवारी

backup backup

पुढारी ऑनलाईन डेस्क : भाजपने आज (दि.२मार्च) लोकसभा निवडणूक 2024 साठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. भाजपने दिल्लीतील मुख्य कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन उमेदवारांची घोषणा केली. १९५ उमेदवारांच्या या यादीमध्ये नवोदितांना संधी देण्यात आली आहे. यामध्ये दिवंगत माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्‍वराज यांच्‍या कन्‍या बांसूरी स्वराज यांच्‍या नावाचा समावेश आहे.

नवोदितांना संधी

भाजपने आपल्या पहिल्या यादीत 195 उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. या यादीत पंतप्रधान मोदींसह ३४ केंद्रीय मंत्र्यांची नावे आहेत. त्याचबरोबर २८ महिला आणि ४७ तरुणांची नावे यामध्ये असल्याने याला अधिक महत्त्व आल्याची चर्चा आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, ईशान्य दिल्लीतून मनोज तिवारी, पश्चिम दिल्लीतून कमलजीत सिंह शेरावत, दक्षिण दिल्लीतून रामवीर सिंग बिधुरी, नवी दिल्लीतून बन्सुरी स्वराज, चांदनी चौकातून प्रवीण सिंग खंडेलवाल यांना तिकीट मिळाले आहे.

दिल्‍लीतील पाच जागांपैकी चार उमेदवार नवोदित

दिल्लीत नव्या चेहऱ्यांवर लक्ष केंद्रित केले आहे. जाहीर झालेल्या पाच जागांपैकी चार जागांसाठी नवे उमेदवार आहेत. भाजपने पुन्हा एकदा मनोज तिवारी यांच्यावर विश्वास व्यक्त करत उमेदवारी दिली आहे. नवी दिल्लीतील सेमिनाक्षी लेखी, चांदनी चौकातील डॉ. हर्षवर्धन, पश्चिम दिल्लीतील प्रवेश वर्मा आणि दक्षिण दिल्लीतील रमेश बिधुरी यांची तिकिटे रद्द करण्यात आली आहेत.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT