Lok Sabha Election 2024 : भाजपकडून उत्तर गोवा लोकसभेसाठी पुन्हा श्रीपाद नाईक यांना उमेदवारी | पुढारी

Lok Sabha Election 2024 : भाजपकडून उत्तर गोवा लोकसभेसाठी पुन्हा श्रीपाद नाईक यांना उमेदवारी

विठ्ठल गावडे पारवाडकर

पणजी : भारतीय जनता पक्षाचे उत्तर गोवा लोकसभा उमेदवार म्हणून केंद्रीय राज्यमंत्री व विद्यमान खासदार श्रीपाद नाईक यांच्या नावाची घोषणा झाली आहे. आज (दि. 2) दिल्लीत भाजपच्या निवडणूक समितीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत भाजपची लोकसभेसाठीची 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. त्यात श्रीपाद नाईक यांच्या नावाचा समावेश आहे. त्यामुळे नाईक यांना पुन्हा उमेदवारी मिळेल की नाही, अशी जी चर्चा सुरू होते त्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. Lok Sabha Election 2024

गोवा भाजपने उत्तर गोव्यासाठी श्रीपाद नाईक यांच्यासह माजी मंत्री दयानंद मांद्रेकर, माजी मंत्री दिलीप परुळेकर व माजी आमदार दयानंद सोपटे यांची नावे पाठवली होती. त्या चार नावातून विद्यमान खासदार असलेले श्रीपाद नाईक यांचे नाव नक्की झाल्याची चर्चा होती. मात्र, प्रदेश भाजप अध्यक्ष व खासदार सदानंद शेट तानावडे व मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे दिल्लीला उमेदवार ठरवण्यासाठी तीन वेळा जाऊन येऊनही फक्त उत्तरेत एक नाव नक्की झाल्याचे सांगत होते. मात्र, श्रीपाद नाईक यांचे नाव घेत नव्हते. दिल्लीतून उमेदवारी घोषित करण्याचे भाजपचे धोरण असल्यामुळे या दोन नेत्यांनी नाईक यांचे नाव घेतले नव्हते. शेवटी दिल्लीतून नाईक यांचे नाव जाहीर झाले आणि श्रीपाद नाईक यांच्या चाहत्यांचा जीव भांड्यात पडला. Lok Sabha Election 2024

Lok Sabha Election 2024 दक्षिणेत दोन नावे चर्चेत

दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघासाठी माजी खासदार अ‍ॅड. नरेंद्र सावईकर व माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर अशी दोन नावे सध्या चर्चेत आहेत. त्या दोघांपैकी एकाची उमेदवारी पुढील दोन दिवसांत जाहीर होणार असल्याचे कळते. अ‍ॅड. नरेंद्र सावईकर हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक व भाजपचे शिस्तबद्ध कार्यकर्ते आहेत. तर बाबू कवळेकर हे 2022 च्या निवडणुकीपूर्वी भाजपात दाखल झाले. मात्र, 2022 च्या विधानसभा निवडणुकीत पराभूत झाले होते. येत्या काळात केपे मतदारसंघ एसटीला राखीव झाल्यास कवळेकर यांना मतदारसंघ राहणार नाही.

हेही वाचा 

Back to top button