Lok Sabha Election 2024

ज्यांचे कार्य-कर्तृत्व नाही तेच लोक जातीचे राजकारण करतात : नितीन गडकरी

करण शिंदे

जळगाव, पुढारी वृत्तसेवा : यंदाची लोकसभा निवडणूक ही मंत्री होणे, खासदार होणे किंवा आमदार होणे याचे स्वप्न नाही तर, समाज बदलणे हे आमचे स्वप्न आहे. माणूस जातीने नाही तर तो त्यांच्या गुणांनी मोठा होत असतो. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी बघितलेले समता प्रस्थापितवादी सरकार स्थापन झाले पाहिजे. त्यासाठी कार्य आणि कर्तृत्व मोठे असले पाहिजे. मी तर शंभर टक्के निवडून येणार आहे. मात्र, ज्यांचे कार्यकर्तृत्व निवडून येण्याचे नाही. तेच लोक जाती-पातीचे राजकारण करतात, असे वक्तव्य नितीन गडकरी यांनी जळगाव येथे झालेल्या प्रचारार्थी सभेत केले.

जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या प्रचारासाठी नितीन गडकरी जळगावला आले होते. त्यांनी आपल्या भाषणाची सुरुवातच बांधवांनो आणि भगिनींनो बऱ्याच वेळानंतर आपले दर्शन घेण्याचे भाग्य लाभले. अशा शब्दांनी केले. ही निवडणूक कोणाचे भविष्य किंवा भवितव्य ठरवणारी नसून, देशाचे भविष्य आणि भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. असे प्रतिपादन केले.

दारिद्र नारायण म्हणजे रोटी कपडा मकान अशी अंतर्गत रूपाने आपण योजना देशात आणली, मात्र गावातील लोक शहरात येऊन झोपडपट्टीत राहायला लागली. कारण शेतीमालाला भाव नाही, प्रक्रिया नाही तसेच शेती मालावर प्रक्रिया करणारे उद्योग यांना महत्त्व दिले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील नागरिक शहरात येऊ लागली आहेत.

उद्योग, व्यापार वाढतो तेथेच रोजगार निर्माण होतो आणि बेरोजगारी दूर होते. आपल्या देशातील निर्यात वाढली पाहिजे त्याबरोबरच आयात कमी झाली पाहिजे. आपल्याला भविष्यात 5 ट्रिलेनियम आर्थिक सत्ता बनवायचे आहे. त्यासाठी धोरणे आखली आहेत. त्याचा परिणाम आता सगळीकडे दिसत आहे, असेही ते म्हणाले.

छत्रपती शिवाजी महाराज हेच आदर्श

मंदिरे बनवून आदर्श राज्य येणार नाही तर त्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे आदर्श असून आपल्याला रामराज्य आणि शिवशाही आली पाहिजे. हे आपले ध्येय असले पाहिजे. तर ते पुढे म्हणाले, संविधान कोणीच बदलू शकत नाही, संविधानाचा 'बी' पार्ट आहे त्यातील कलम आहेत, ते मात्र बदलू शकतात. त्यामुळे संविधान तोडायची आणि मोडायचे हे काम गेल्या 60 वर्षात 80 वेळा काँग्रेसने केले, याची उत्तर त्यांनी द्यावे असाही प्रश्न गडकरींनी यावेळी प्रश्न उपस्थित केला. देशातील सर्वांसाठी आम्ही सगळ्या योजना तयार केलेल्या आहेत. त्यामध्ये कोणताही भेदभाव केलेला नाही, भविष्यात भविष्यासाठी निर्णय घ्यायचाय आपल्याला आपलं सुखांक वाढवायचा आहे. त्यासाठी मतदान करावे असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

हेही वाचा :

SCROLL FOR NEXT