कुड्डालोर मतदारसंघातील पट्टाली मक्कल काची पक्षाचे उमेदवार थांगार बच्‍चन  यांनी पोपटच्‍या मदतीने भविष्‍य सांगणार्‍या सेल्‍वाराज यांच्‍याकडून आपलं राजकीय भविष्‍य जाणून घेतलं.  
Latest

Lok sabha election 2024 : पोपटाने वर्तवलं निवडणूक निकालाचे भाकित…व्‍हिडिओ व्‍हायरल आणि….

नंदू लटके

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : देशभरात तापमानाचा पारा वाढीबरोबरच लोकसभा निवडणुकीची रणधुमाळीही शिगेला पोहचली आहे. प्रभावी प्रचाराबरोबर मतदारांना आकर्षित करण्‍यासाठी उमेदवार अनेक उठाठेवी करताना दिसतं आहेत. अशीच उठाठेव तामिळनाडूतील कुड्डालोर मतदारसंघातील पट्टाली मक्कल काची (पीएमके) पक्षाचे उमेदवार थांगार बच्‍चन यांनी केली आहे. जाणून घेवूया त्‍यांनी केलेल्‍या व्‍हायरल व्‍हिडिओमुळे नेमकं काय घडलं? याविषयी…

पोपटाने उचलले कार्ड…

थांगार बच्‍चन हे एक चित्रपट दिग्दर्शकही आहेत. ते कुड्डालोर मतदारसंघातून पट्टाली मक्कल काची पक्षाच्‍या (PMK) वतीने लोकसभेची निवडणूक लढवत आहेत. प्रचार काळात त्‍यांनी रस्‍त्‍यावर पोपटाच्‍या मदतीने भविष्‍य सांगणार्‍याकडे निवडणूक कोण जिंकणार, असा सवाल केला. पोपटच्‍या मदतीने भविष्‍य सांगणार्‍या सेल्‍वाराज याने त्‍याचे उत्तर दिले. सेल्‍वराज यांनी सांगितले की, थांगार बच्चन निवडणुकीत विजयी होतील कारण पोपटाने त्याच्यासाठी एक कार्ड निवडले, ज्यावर भगवान अझागुमुथु अय्यानारची प्रतिमा होती. थांगार यांच्‍या कार्यकर्त्यांनी या प्रसंगाचा व्‍हिडिओ शूट केला. मतदारसंघात तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्‍हायरल झाला. अखेर याची दखल जिल्‍हा वन विभागाने घेतली.

पोपटाला कैदेत ठेवल्याबद्दल दोघे ताब्‍यात

व्हिडिओ व्हायरल झाल्‍यानंतर याची दखल वनविभागाने घेतली. पोपटाला कैदेत ठेवल्याबद्दल कुड्डालोर जिल्हा वन विभागाने पोपट भविष्यवेत्त्या सेल्वाराज याला मंगळवारी अटक केली. कुड्डालोर जिल्हा वनपरिक्षेत्र अधिकारी जे रमेश म्हणाले की, वन्यजीव (संरक्षण) कायदा, 1972 अंतर्गत पोपटांचे अनुसूचित II प्रजातींनुसार वर्गीकरण करण्यात आले आहे आणि पक्ष्यांना कैदेत ठेवणे हा गुन्हा आहे. भविष्य सांगणारा सेल्वराज आणि त्याचा भाऊ श्रीनिवासन यांना पोपट पिंजऱ्यात अडकवल्याबद्दल पाणरुत्ती येथे ताब्यात घेण्यात आले होते. नंतर त्यांना इशारा देऊन सोडण्यात आले आहे. त्‍यांना दहा हजार रुपयांपर्यंत दंड आकारला जाईल, असेही वनविभागाने स्‍पष्‍ट केले आहे.

PMK  प्रमुख अंबुमनींकडून द्रमुक सरकारचा निषेध

या कारवाईचा प्रकरणी पट्टाली मक्कल काची पक्षाचे अध्‍यक्ष अंबुमणी रामदास यांनी तामिळनाडूमधील सत्ताधारी द्रमुक सरकारचा निषेध केला आहे. पीएमकेचा उमेदवार कुड्डालोर लोकसभा मतदारसंघ जिंकेल, हे द्रमुकच्‍या पचनी पडू शकत नाही. हे कृत्य राज्‍य सरकारची हुकूमशाही दर्शवते. त्याचा निषेध केला पाहिजे. या कारवाईने द्रमुकला पराभवाची भीती दाखवली. तर्कशुद्ध पक्ष असल्याचा दावा करणाऱ्या द्रमुकला पोपटाच्‍या मदतीने भविष्‍य सांगणार्‍याचे भाकीतही सहन होत नाही. पक्ष किती मूर्खपणा आणि अंधश्रद्धेत बुडाला आहे हे देखील या कारवाईने उघड केले आहे," असे अंबुमनी यांनी आपल्‍या X वरील पोस्टमध्‍ये म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT