पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभरतील कोट्यवधी फुटबॉल प्रेमींची धडकन असणारा लिओनेल मेस्सीने (Lionel Messi) फुटबॉलमधून निवृत्तीची घोषणा केली आणि अनेकांच्या हृदयाचा ठोकाच चुकला. कतारमध्ये होणाऱ्या फिफा वल्डकपनंतर (FIFA World Cup) आपण खेळातून संन्यास घेणार असल्याचे मेस्सीने घोषित केले आहे. अर्जेंटिनाच्या ३५ वर्षीय या खेळाडूचे आणि त्याच्या जादुई खेळीचे जगभर करोडो चाहते आहेत.
२००५ पासून अर्जेंटिनासाठी फुटबॉल खेळायला सुरु केलेला मेस्सी अल्पावधीतच प्रसिद्धीस आला. त्याने आजपर्यंत इंटरनॅशनल सामन्यांमध्ये ९० गोल केले आहेत. मेस्सीच्या टीमने आजपर्यंत एकही वर्ल्डकप जिंकलेला नाही, पण मेस्सीच्या रोनाल्डोच्या तोडीस तोड असणाऱ्या खेळीने अर्जेंटिना टीम जगभर प्रसिद्ध झाली. २०१४ च्या वर्ल्डकपच्या फायनल मॅचमध्ये अर्जेंटिना हरली होती पण या सामन्यातील मेस्सीच्या खेळीने अर्जेटिनाला 'बाजीगर' म्हणून ओळखले जाऊ लागले.
हे वाचलंत का?