दिवाळी दिवा 
Latest

Dipotav_2022 : दिवाळीत दिवे ‘या’ दिशेला लावा, मिळेल सुखसमृद्धी, वास्तुशास्त्र काय सांगते?

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सध्या सर्वत्र दिवाळीची लगबग सुरु असून बाजारपेठा नवनवीन वस्तूंनी भरून गेल्या आहेत. दिवाळी हा दिव्यांचा, रोषणाईचा सन. प्रत्येक घरी एक दिवा असो व अनेक दिवे, पणत्या लावून एक वेगळाच उजाळा निर्माण केला जातो. पण आपल्याला माहित आहे का की, भारतीय परंपरेत दिव्यांना सुद्धा धार्मिक महत्व आहे. तसेच दिवाळीत दिवे लावण्यालाही एक शास्त्रानुसार आहे. चला तर जाणून घेऊया या शास्त्राबद्दल.

दिवाळीमध्ये आपण घरामध्ये, ऑफिसमध्ये आणि इतर कामाच्या ठिकाणी पूजा आणि इतर गोष्टींवेळी दिवे लावत असतो. अग्नी हा जीवनातील पाच उर्जेच्या स्त्रोतांपैकी एक होय. त्याचबरोबर दैवी प्रकाशाचे प्रातिनिधिक रूप म्हणूनही याकडे पहिले जाते. जे नकारात्मक कल्पना दूर करते.

वास्तुतज्ज्ञांच्या मते, घराच्या चारही दिशांना विविध रंगांचे मातीचे दिवे लावावेत, ज्यामुळे घरामध्ये जीवनात शांती आणि समृद्धी येते. हे दिवे फुटलेले किवा चिरा पडलेले नसावेत. सहसा निरोगी राहण्यासाठी दिवाळीचे दिवे पूर्वाभिमुख ठेवण्याची परंपरा असून दिव्यांची संख्या आदर्श संख्या ९, २७, १०८, १००८ अशी आहे.

घर किंवा ऑफिस जिथे आपण दिवे लावणार असू तिथे पूर्वेस हिरव्या रंगाचा, पश्चिमेस गडद निळा, दक्षिणेस लाल, उत्तरेस निळा, आग्नेयेस नारंगी, नैऋत्येस गुलाबी, वाव्यवेस निळा किंवा राखाडी आणि ईशान्येस राखाडी असे दिव्यांचे रंग असावेत असे सांगितले जाते. घरामध्ये पूजेच्या ठिकाणी अथवा मध्यवर्ती ठिकाणी एक पूर्ण दिवाळीभर तेवणारा दिवा ठेवावा, तसेच दिवाळीला सर्वात आधी हा दिवा प्रज्वलित करावा असेही सांगितले जाते.

पारंपारिकपणे, लोक दिवाळीचे दिवे लावण्यासाठी शुद्ध तूप वापरतात. पण सध्याच्या महागाईमुळे असो व शुद्ध तूप मिळत नसल्याने असो आपण मोहरी (सरसो) आणि तीळ (तिळ) तेल सुद्धा वापरू शकतो.

हे वाचलंत का?

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT