Relationship Tips file photo
lifestyle

Relationship Tips: पत्नीच्या 'या' ६ गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका... अन्यथा नात्यात येईल दुरावा!

नात्यात रुसवे-फुगवे होणे ही सामान्य बाब आहे, पण पती-पत्नीच्या नात्यात सर्वात धोकादायक स्थिती ती असते जेव्हा नाराजी शब्दांतून व्यक्त न होता मौन आणि इशाऱ्यांमध्ये लपलेली असते.

पुढारी वृत्तसेवा

Relationship Tips

नात्यात रुसवे-फुगवे होणे ही सामान्य बाब आहे, पण पती-पत्नीच्या नात्यात सर्वात धोकादायक स्थिती ती असते जेव्हा नाराजी शब्दांतून व्यक्त न होता मौन आणि इशाऱ्यांमध्ये लपलेली असते. अनेकदा पतीला वाटते की, जर घरात भांडण होत नाही किंवा वाद होत नाहीत, तर सगळं काही ठीक आहे.

मात्र, बऱ्याचदा ही शांतता येणाऱ्या वादळापूर्वीची चाहूल असू शकते. जर तुमच्या पत्नीच्या वागण्यात खालील ६ बदल झाले असतील, तर समजून जा की तिच्या मनात काहीतरी सुरू आहे.

१. 'काही नाही' आणि 'सगळं ठीक आहे'चा सतत वापर

जेव्हा तुम्ही पत्नीला विचारता की "काय झालं?" आणि त्यावर हळू आवाजात "काही नाही" किंवा "सगळं ठीक आहे" असे उत्तर येते, तेव्हा समजून जा की नक्कीच काहीतरी बिनसले आहे. जेव्हा महिलांना वाटते की समोरची व्यक्ती त्यांच्या भावना समजून घेणार नाही, तेव्हा त्या आपल्या भावना या छोट्या शब्दांमागे लपवतात.

२. घरात अचानक शांतता

जी पत्नी दिवसभर घराच्या गप्पा, ऑफिसचे किस्से किंवा मुलांच्या तक्रारी तुमच्याशी शेअर करायची, ती जर अचानक शांत झाली असेल तर हा एक सिग्नल आहे. ही शांतात सुचवते की, ती मानसिकदृष्ट्या तुमच्यापासून लांब जात असून तिने भावना व्यक्त करणे बंद केले आहे.

३. "राहू दे, माझं मी बघून घेईन" असे म्हणणे

तुमच्या पत्नीने अचानक तुमची मदत घेणे बंद केले आहे का? जर तुम्ही कामात मदत करायला गेलात आणि तिने "राहू दे, मला कोणाची गरज नाही, मी स्वतः करू शकते," असे उत्तर दिले, तर हा तिचा स्वावलंबन नसून राग आहे. जेव्हा तिला तुमची गरज होती तेव्हा तुम्ही तिथे नव्हता, हेच तिला यातून दाखवायचे असते.

४. जुन्या चुका उकरून काढणे आणि टोमणे मारणे

जर साध्या संभाषणातही जुन्या गोष्टींचा उल्लेख होऊ लागला किंवा किरकोळ कारणावरून ती उपरोधिकपणे बोलू लागली, तर समजा की तिच्या मनात खूप राग साठलेला आहे. ती सध्याची अडचण थेट सांगू शकत नाहीये, म्हणून जुन्या चुकांच्या माध्यमातून आपला राग बाहेर काढत आहे.

५. वागण्यातून राग व्यक्त करणे

अनेकदा राग वागण्यातून दिसतो. म्हणजे, जोरात दरवाजा आदळणे. स्वयंपाकघरात भांडी आदळणे किंवा वस्तू जोरात ठेवणे. तुमचे बोलणे ऐकताना दीर्घ सुस्कारे सोडणे. तुम्ही खोलीत असतानाही तुमच्याकडे दुर्लक्ष करून फोन किंवा टीव्हीमध्ये मग्न राहणे.

६. लांब राहणे

नात्यातील जवळीक ही डोळ्यांत पाहून बोलण्याने जाणवते. जर तुमची पत्नी तुमच्याशी बोलताना नजर चोरत असेल, तुमच्या शेजारी बसणे टाळत असेल किंवा तुमच्या स्पर्शाने अस्वस्थ होत असेल, तर तिला नक्कीच कशाची तरी मनाला खोलवर जखम झाली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT