आपण आपल्या केसांना स्वच्छ ठेवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. मग तो महागडा आयुर्वेदिक असो किंवा रासायनिक घटकांनी युक्त शाम्पू. पण इतके उपाय करूनही कोंडा (Dandruff), खाज (Itching) आणि केस गळणं (Hair Fall) यांसारख्या समस्या वारंवार का येतात? याचा कधी विचार केलाय का?
रोजची धावपळ अन् घाईगडबडीत अनेकदा आपण कंगव्याची स्वच्छता (Hygiene) ठेवायला विसरतो.
कंगव्यावर जमा झालेली धुळ, तेल, कोंडा आणि जंतू (Bacteria) दररोज आपल्या टाळूच्या (Scalp) संपर्कात येतात आणि टाळूला आजारी बनवतात.
जेव्हा आपण कंगवा वापरतो, तेव्हा टाळूवरील कोंडा, धूळ, तेल आणि बॅक्टेरिया सहजपणे कंगव्याच्या पृष्ठभागावर जमा होतात.
जेव्हा आपण केस धुतल्यानंतर स्वच्छ केसांवर तोच कंगवा वापरतो, तेव्हा ही सगळी घाण पुन्हा टाळूपर्यंत पोहोचते.
ओलावा (Moisture) आणि गलिच्छ पृष्ठभाग हे बॅक्टेरिया आणि बुरशीच्या (Fungus) वाढीसाठी आदर्श ठिकाण असते.
कंगव्यावर आधीच तेल, घाण आणि कोंडा असतो, ज्यामुळे बॅक्टेरिया वाढायला लागतात. अशावेळी हा गलिच्छ कंगवा केस आणि टाळूचे नुकसान करण्यासाठी पुरेसा ठरतो.
आयुर्वेद सांगते की, रोजच्या वापरातील अस्वच्छ कंगवा किमान आठवड्यातून एकदा तरी नक्की साफ करावा.
जर तुमच्या टाळूवर कोंडा, खाज किंवा बुरशीचा धोका जास्त असेल, तर आठवड्यातून दोनदा कंगवा स्वच्छ करून नंतरच वापरा.
जेव्हा तुम्ही केस धुता, तेव्हा तुमचा कंगवा देखील सोबतच साफ करा. जेणेकरून तुम्ही स्वच्छ केसांवर बॅक्टेरिया-मुक्त आणि स्वच्छ कंगव्याचा वापर कराल.
कंगवा साफ करण्याची पद्धत खूप सोपी आहे.
एका भांड्यात हलके गरम पाणी घ्या आणि त्यात शाम्पू टाका.
या शाम्पूच्या मिश्रणात कंगवा 10 ते 15 मिनिटांसाठी भिजवून ठेवा.
त्यानंतर जुन्या टूथब्रशच्या मदतीने कंगवा व्यवस्थित घासून साफ करा.
यामुळे कंगव्यामधील सर्व घाण आणि बॅक्टेरिया निघून जातील आणि तुमचा कंगवा अगदी स्वच्छ होईल.