मुंबई : पुढारी वृत्तसेवा; गोरेगाव पूर्व आरे कॉलनी येथे बिबट्याने एका चार वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना काल (सोमवार) रात्री घडली. आरे कॉलनीतील हिल कॉटर आदर्श नगर या ठिकाणी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बिबट्याने हल्ला केलेल्या मुलाचे नाव हिमांशू यादव असून तो चार वर्षांचा आहे.
आदर्श नगर येथून नवरात्री उत्सवात गरबा खेळून घरी जात असताना रस्त्याजवळ हिमांशूवर पाठिमागून बिबट्याने हल्ला केला. हिमांशू हा त्याच्या मित्रांसोबत घरी जात होता. सोबत मित्र असल्यामुळे हिमांशूचा जीव वाचला. त्याला तात्काळ स्थानिकांसह कुटुंबियांनी जोगेश्वरी येथील बाळासाहेब ठाकरे ट्रामा रुग्णालयात दाखल करण्यात आले. रस्त्यावरून जात असताना अचानक मागच्या बाजूने हल्ला केल्यामुळे कमरेच्या खाली तीन ते चार ठिकाणी जखमा असल्याचे दिसून येत आहे. सध्या हिमांशूवर जोगेश्वरी येथील ट्रामा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
हेही वाचा :