basavraj hatti 
Latest

कर्नाटक विधान परिषद निकाल : भाजपचे बसवराज होरट्टी विजय, आठव्यांदा विधानपरिषदेत प्रवेश

स्वालिया न. शिकलगार

बेळगाव : पुढारी वृत्तसेवा : पश्‍चिम शिक्षक मतदारसंघातून भाजपचे उमेदवार आणि विधान परिषदेचे विद्यमान सभापती बसवराज होरट्टी यांनी विजय मिळवला. त्यांना विजयी घोषित करण्यात आले असून प्रादेशिक आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी अमलान अदित्य बिश्वास यांच्या हस्ते त्यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

पश्चिम शिक्षक मतदार संघामध्ये एकूण सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते व त्यांचे मुख्य लढत हे काँग्रेसचे उमेदवार बसवराज गुरीकर यांच्यासोबत होती. बसवराज होरटी यांना या निवडणुकीत ९ हजार २६६ मते मिळाली तर बसवराज गुरीकर यांना ४ हजार ५९७ मते मिळाली. होरट्टी यांनी काँग्रेसचे उमेदवार गूरीकर यांच्यावर ४ हजार ६६९ मतांनी विजय मिळवला.

या विजयाने बसवराज होरट्टी हे विधान परिषदेचे आठव्यांदा आमदार झाले आहेत. विधान परिषदेत आठव्यांदा प्रवेश करणारे होरट्टी हे देशातील पहिलेच आमदार ठरले आहेत.

हेदेखील वाचा-

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT