पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून (सीईटी सेल) विधी पाच वर्षे आणि बी.ए./बी.एस्सी. बी.एड्. या अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. त्यानुसार विधी आणि बी.ए./बी.एस्सी. बी.एड्. अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना 22 जूनपर्यंत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याची प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू करण्यात येईल, अशी माहिती सेलचे आयुक्त महेंद्र वारभुवन यांनी दिली आहे.
सीईटी सेलने 15 जूनपासून इंजिनीअरिंग, एमबीए, एमसीए, विधी, अॅग्रिकल्चर, फार्मसी, भुवन, बी.ए./बी.एस्सी. बी.एड्.-एम.एड अशा विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेला सुरुवात करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे सांगण्यात आले होते. त्यानुसार सध्या विधी आणि बी.ए./बी.एस्सी. बी.एड्. अशा दोनच अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेची सुरुवात करण्यात आली आहे. त्यानुसार या दोन्ही अभ्यासक्रमासाठी विद्यार्थ्यांना 22 जूनपर्यत नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. त्याचप्रमाणे शैक्षणिक कागदपत्रे अपलोड करण्यासोबतच, त्यांची पडताळणी 'ई- स्क्रूटिनी टीम'कडून 25 जूनपर्यंत होणार आहे.
त्यानंतर प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांची यादी 26 जूनला प्रसिद्ध होईल. या यादीबाबत विद्यार्थ्यांना आक्षेप किंवा हरकती नोंदवायच्या असल्यास, त्या 26 ते 28 जून या कालावधीत नोंदवता येतील. प्रवेश प्रक्रियेत महाविद्यालयांचे पसंतीक्रम भरण्याचा टप्पा महत्त्वाचा असतो. ही प्रक्रिया येत्या काही दिवसांत सुरू होणार आहे. विद्यार्थ्यांनी सविस्तर माहितीसाठी सीईटी सेलच्या https://cetcell. mahacet.org या वेबसाइटला भेट देण्याचे आवाहन केले आहे.
हे ही वाचा :