पुणे : डॉ. रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे : डॉ. रामोड यांचा जामीन अर्ज फेटाळला

पुणे, पुढारी वृत्तसेवा : महामार्गावरील भूसंपादनाचा मोबदला देण्यासाठी लाच मागितल्या प्रकरणातील महसूल विभागातील अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड यांचा जामीन अर्ज न्यायालयाने शुक्रवारी (दि. १६) फेटाळला. सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी हा आदेश दिला.

डॉ. रामोड यांना आठ लाख रुपयांची लाच घेताना केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (सीबीआय एसीबी) पथकाने ९ जून रोजी पकडले होते. त्यानंतर, सुरवातीस तीन दिवसांची सीबीआय कोठडी व त्यानंतर २७ जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायाधीश ए. एस. वाघमारे यांनी दिले आहेत. त्यानंतर त्यांची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या डॉ. रामोड याने अ‍ॅड. सुधीर शहा यांमार्फत बुधवारी (दि. १४) जामीनासाठी अर्ज केला होता.

हेही वाचलंत का?

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news