Latest

हिंगोली : गावठी कट्यासह २ जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या तरुणास अटक

निलेश पोतदार

हिंगोली; पुढारी वृत्तसेवा कळमनुरी तालुक्यातील बोल्डावाडी शिवारात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका व्यक्तीची तपासणी केली. यामध्ये 1 गावठी पिस्टल व २ राऊंड, एक लोखंडी खंजीर जप्त केला आहे. या प्रकरणी वसमत येथील कैलास रमेश शिंदे (वय 32) याच्यावर आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आज (शुक्रवार) पहाटे गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

जिल्‍ह्यात रात्रीच्या वेळी धावणाऱ्या वाहनांची तपासणी मोहिम हाती घेण्यात आली आहे. यासाठी पोलिस अधिक्षक जी. श्रीधर यांनी जिल्‍ह्यातील तेरा पोलिस ठाण्याचे पथक तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक नियुक्त केले आहे. रात्री आकरा वाजल्यापासून पहाटे पाच वाजेपर्यंत जिल्ह्यातील मार्गावरून धावणाऱ्या वाहनांची तपासणी करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक उदय खंडेराय, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार, शिवसांब घेवारे, जमादार सुनील अंभोरे, भगवान आडे, संभाजी लकुळे, किशोर आडे यांच्यासह पथक गुरुवारी सायंकाळपासूनच गस्तीवर होते.

या पथकाने कुरुंदा ते बोल्डा मार्गावर बोल्डावाडी शिवारात एका स्विफ्ट डिझायर कारला (क्र.एमएच-13-एझेड-7161) थांबविले. यावेळी कारमधील कैलास शिंदे (रा. कौठा रोड वसमत) याच्याकडे चौकशी केली असता, त्याने उडवा उडवीची उत्तरे देण्यास सुरवात केली. या प्रकारामुळे पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी कारची तपासणी सुरु केली. यावेळी कारमध्ये एक लोखंडी खंजीर आढळून आले. त्यामुळे पोलिसांनी कैलासची झडती घेतली असता, त्याच्या जवळ एक गावठी पिस्टल व सहा एमएमचे दोन राऊंड जप्त करण्यात आले. या शिवाय पोलिसांनी स्विफ्ट डिझायर कार देखील जप्त केली. या प्रकरणी सहाय्यक पोलिस निरीक्षक सुनील गोपीनवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून कैलास शिंदे याच्या विरुध्द आखाडा बाळापूर पोलिस ठाण्यात आज (शुक्रवार) पहाटे गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून, सहाय्यक पोलिस निरीक्षक पंढरीनाथ बोधनापोड, जमादार मधुकर नागरे पुढील तपास करीत आहेत.

हेही वाचा : 

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT