Modern fighter aircraft : सर्वात अद्ययावत लढाऊ विमानाची निर्मिती | पुढारी

Modern fighter aircraft : सर्वात अद्ययावत लढाऊ विमानाची निर्मिती

वॉशिंग्टन : अमेरिकन हवाई दल (Modern fighter aircraft) सध्या वेगाने आपल्या स्ट्रॅटेजिक बॉम्बर्सची फ्लीट वाढवत आहे. याच दरम्यान आता शुक्रवार, दि. 2 डिसेंबरला या फ्लीटमध्ये ‘बी-21’ रेडर बॉम्बरही समाविष्ट होत आहे. नव्या वर्षाच्या सुरुवातीस ते तैनात केले जाईल. हे विमान बनवण्यासाठी 16 हजार कोटी रुपयांचा खर्च आला आहे. हे जगातील सर्वात अद्ययावत असे लढाऊ विमान आहे.

अमेरिकेचा दावा आहे की या विमानाचे तंत्रज्ञान (Modern fighter aircraft) इतके अद्ययावत आहे की जगातील कोणतेही रडार त्याचा छडा लावू शकत नाही. हे विमान वेपन डेव्हलपमेंट कंपनी नॉथ्रोप ग्रुम्मनने बनवले आहे. हे एक दीर्घ पल्ल्याचे डिजिटल बॉम्बर असून त्याचा आकार अन्य बॉम्बरपेक्षा लहान आहे. ते आपल्यासमवेत 13,607 किलोग्रॅमपर्यंतचे पेलोड घेऊन उड्डाण करू शकते. त्यामधील एक मोठा हिस्सा इंटर्नल फ्यूएलचा आहे. अन्य हिश्श्यात बॉम्ब आणि क्षेपणास्त्रे असतील.

या विमानात (Modern fighter aircraft) जगातील सर्वात आधुनिक स्टील्थ फीचर असेल जे जगातील कोणत्याही रडारने पकडता येत नाही. यामध्ये लॉकहीड मार्टिनच्या एवियॉनिक्स आणि एफ-35 मध्ये बसवलेले काही सेन्सर्सचाही वापर करण्यात आला आहे. कॅलिफोर्नियाच्या पामडेल येथील एअर फोर्स प्लँट 42 मध्ये हे विमान बनवण्यात आले.

हेही वाचा :   

Back to top button