पुणे; पुढारी वृत्तसेवा : हवामान अंदाज : आज आणि उद्या (दि.२४ व २५) रोजी सातारा व रत्नागिरी जिल्ह्यात हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे. तसेच कोल्हापूर, सातारा, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे येथे ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान अंदाज
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचा हा परिणाम असून कोकण व मध्य महाराष्ट्रात अजून किमान चार दिवस मोठ्या पावसाचा अंदाज आहे.
२४ ते २७ जुलै दरम्यान महाराष्ट्र् ते कर्नाटक या भागावर कमी दाबाचा पट्टा
कायम राहणार आहे. २५ जुलैपर्यंत ऑरेंज तर २६ व २७ जुलैपर्यंत येलो अलर्ट जरी करण्यात आला आहे. याबाबत पुणे वेधशाळेचे प्रमुख अनुपम कश्यपी यांनी पुढारीशी बोलताना माहिती दिली.
दोन दिवसांपासून सुरू असणार्या मुसळधार पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली आहे. कृष्णा, कोयना नदी ला पूर आला आहे. कोयना नदी ने इशारा पातळी ओलांडून धोक्याच्या पातळीकडे कूच केली आहे.
पावसाचा जोर ओसरल्यामुळे शनिवारी दुपारी कोयना धरणाचे दरवाजे आठ फुटापर्यंत कमी करण्यात आले आहेत. धरणातून सध्या 40
जार क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू आहे.
पावसाचा जोर ओसरल्यामुळे मध्यरात्री कोयना धरणाचे दरवाजे सहा इंचाने कमी करण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने दरवाजे आठ फुटांपर्यंत कमी करण्यात आले आहेत. वीजनिर्मिती करून धरणाच्या पायथा वीजगृहातून प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
रत्नागिरी अपडेट
चिपळूणमध्ये आलेल्या जलप्रलयामुळे शहराची अवस्था भयानक झाली असून, आतापर्यंतची पुराने गाठलेली ही उच्चांकी पातळी आहे. बचाव पथकाने शुक्रवारी सायंकाळपर्यंत दीड हजार जणांना बाहेर काढले.
या पुरामुळे 10 कोरोना रूग्णांचा मृत्यू झाला तर घरामध्ये पाणी घुसल्याने आणखी पाच ते सहा जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता प्रशासनाने वर्तवली आहे. चिपळुणात सध्या शासकीय व स्वयंसेवी अशी 36 पथके मदतकार्य करीत आहेत.
चिपळूण तालुक्यातील पूरस्थिती सुधारली असून, बहुतांश पाणी ओसरले आहे. सध्या एनडीआरएफची 4 पथकामधील 88 जवान, आर्मीचे 5 पथकातील 36 जवान, तटरक्षक दलातील 2 पथकातील 14 जवान, नौदलाच्या 5 पथकातील 120 जवान, हवाईदलाचे 2 पथकाच्या 12 जवान तसेच रत्नागिरी जिल्ह्यातील 15 व सिंधुदुर्गातील 3 स्वयंसेवी संस्थांमार्फत मदतकार्य सुरु आहे.
नागरिकांना सुरक्षितस्थळी स्थलांतरीत करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरु आहे. सर्वांनी सावधानता व सुरक्षितता बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
हे ही वाचलं का
पाहा फोटोज :
visual_portfolio id="11633"]