खेड तालुक्यात पोसरे बौद्धवाडीत १७ जण गाडल्याची भिती | पुढारी

खेड तालुक्यात पोसरे बौद्धवाडीत १७ जण गाडल्याची भिती

खेड; पुढारी वृत्तसेवा : खेड तालुक्यात धक्कादायक घटना समोर आली आहे. पोसरे बौद्धवाडी येथे तब्बल १७ जण दरडीखाली असल्याची भीती आहे तर बीरमणी येथे दोन जण अडकले आहेत. पोसरे बौध्दवाडीमध्ये १७ व्यक्तींसह २५ गुरे दरडीखाली दबली गेली असल्याची माहिती पुढे आली आहे.

या ठिकाणी एनडीआरफची टीम पाठवण्यात आली आहे. एनडीआरफची आणखी एक टीम बोलावण्यात आली आहे. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु असल्याची माहिती आमदार योगेश कदम यांनी दिली. बीरमणी येथेच अलीकडे दोन किमीचा रस्ता खचला आहे अशी माहिती मिळत आहे.

खेड तालुका प्रशासनाने मतदकार्य सुरु केले आहे. मदतकार्य करण्याची सूचना देऊन पुढील आवश्यक ती कार्यवाही केली जईल प्रयत्न युद्धपातळीवर सुरु असल्याचे आमदार योगेश कदम यांनी सांगितले.

मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील पुल गेला वाहून

कालपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसाने चिपळूण शहराला दणका दिला व प्रचंड वित्तहानी केली. दरम्यान, मुंबई गोवा महामार्गावरील वाशिष्टी नदीवरील महत्त्वाचं पूल असलेल्या ब्रिटिशकालीन पुलांचा काही भाग वाहून गेला आहे.

आज पहाटे हा प्रकार घडला असून पुलाच्या मधोमध असलेला काही भाग वाहून गेला आहे. त्यामुळे या मुंबई गोवा महामार्गावरील  वाहतूक आता पूर्णपणे ठप्प झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गेले दोन दिवस या पुलावरून पाच ते सहा फूट पाणी सतत वेगाने वाहत होते. हा पूल जुन्या काळातील ब्रिटिशकालीन आहे.

नवीन पुलाचे काम सुरू असल्यामुळे या पुलावरूनच सध्या मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक सुरू होती. आज पावसाचा जोर कमी झाल्यानंतर नदीच्या पाण्याचा जोरही कमी झाला.

PHOTOS : मराठी अभिनेत्री कार्टून लुकमध्ये कशा दिसतील?

Visual Portfolio, Posts & Image Gallery for WordPress

Back to top button