Latest

सोलापूर : सिद्धेश्वर कारखाना बचावसाठी शेतकर्‍यांचा विराट मोर्चा, कामगार, विविध संस्था, संघटनांचा सहभाग

निलेश पोतदार

सोलापूर ; पुढारी वृत्तसेवा : बोरामणी येथे राज्य सरकारने मंजूर केलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरू करावे, श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याला कोणताही धक्का न लावता होटगी रोड विमानतळावरून तूर्त विमानसेवा एका बाजूने सुरू करावी, कारखान्यास दिलेल्या सर्व नोटिसा प्रशासनाने मागे घ्याव्यात आणि दरवर्षीच्या गाळप हंगामात कारखान्यास जाणूनबुजून दिला जाणारा त्रास कायमस्वरुपी थांबवावा. या मागण्यांसाठी आज (सोमवार) सकाळी कारखाना कार्यस्थळापासून होम मैदानापर्यंत शेतकर्‍यांचा विराट मोर्चा काढण्यात आला.

कारखाना कार्यस्थळापासून सकाळी 9.30 वाजता मोर्चास सुरुवात झाली. हत्तुरे वस्ती, मजरेवाडी, आसरा, जुना होटगी नाका, सात रस्ता, रंगभवन मार्गे मोर्चा होम मैदान येथे पोहोचला. त्या ठिकाणी मोर्चाचे सभेत रुपांतर होणार आहे. या मोर्चात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील, सिध्दाराम म्हेत्रे, विश्वनाथ चाकोते, शिवशरण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, स्वामी समर्थ सूतगिरणीचे अध्यक्ष राजशेखर शिवदारे, शेतकरी संघटनेचे नेते जाफरताज पाटील, अख्तरताज पाटील, शिवानंद दरेकर, इक्बाल मुजावर, अमोल हिप्परगी, अंकुश आवताडे, बोरामणी विमानतळ कृती समितीचे अध्यक्ष राजू चव्हाण, कारखान्याचे अध्यक्ष अण्णाराज काडादी, उपाध्यक्ष सिध्दाराम चाकोते, सिध्देश्वर साखर कामगार युनियनचे सरचिटणीस अशोक बिराजदार आदी उपस्थित होते.

पाच किलोमीटर पायपीट 

श्री सिद्धेश्वर सहकारी कारखान्याची चिमणी वाचविण्यासाठी व बोरामणी येथील नियोजीत आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरात लवकर सुरु व्हावे या मागणीसाठी काढण्यात आलेल्या मोर्चात कारखान्याचे माजी अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह शेकडो शेतकरी कुमठे येथील श्री सिध्देेश्वर साखर कारखाना ते होम मैदान असे सलग पाच किलोमीटरचे अंतर पायी चालत मोर्चात सहभाग घेतला.

हेही वाचा : 

SCROLL FOR NEXT