Latest

सितरंग चक्रीवादळ: समुद्रात बोट बुडाली; तटरक्षक दलाने वाचवले २० मच्छीमारांचे प्राण

मोनिका क्षीरसागर

पुढारी ऑनलाईन : सितरंग चक्रीवादळादरम्यान मासेमारी बोट समुद्रात बुडाली. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने वेगाने बचाव मोहिम हाती घेत, २० बांगलादेशी मच्छीमारांचे प्राण (सितरंग चक्रीवादळ) वाचवले आहेत. हे मच्छीमार तटरक्षक दलाला भारत-बांग्लादेश आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळील सागर बेटापासून सुमारे ९० समुद्री मैल अंतरावर दिसले. यानंतर तटरक्षक दलाने या मच्छीमारांना सुरक्षितपणे बाहेर काढले.

एका वृत्तानुसार, मासेमारी बोट किनाऱ्यावर परतत असताना, ती अचानक बुडाली आणि एका ठिकाणी अडकली. यानंतर भारतीय तटरक्षक दलाने ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या समुद्रात अडकलेल्या सितरंग चक्रीवादळ) मासेमारी बोटीतील मच्छीमारांना डॉर्नियर विमानाच्या सहाय्याने बाहेर काढण्यात आले. त्यानंतर या मच्छीमारांना भारतीय तटरक्षक दलाच्या विजया जहाजामध्ये सुरक्षितपणे उतरवण्यात आले आहे.

पश्चिम बंगाल पाठोपाठ सितरंग चक्रीवादळाने आता ईशान्येकडील काही राज्यांमध्ये कहर सुरू केला आहे. या वादळाने आसाममधील (Assam) परिस्थिती चिंताजनक झाली आहे. येथील सुमारे ८३ गावांतील ११०० हून अधिक लोकांना या चक्रीवादळाचा फटका बसला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसात मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले आहे. आसाम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, वादळामुळे आतापर्यंत ११४६ लोकांना याचा फटका बसला आहे.

हेही वाचा:

SCROLL FOR NEXT