Latest

सातारा : महाबळेश्वर बसस्‍थानकात बॉम्‍ब ठेवल्‍याचा फोन आला अन्…

निलेश पोतदार

सातारा; पुढारी वृत्‍तसेवा : महाबळेश्वर बस स्थानकात बॉम्ब ठेवल्याच्या अफवेवरुन आज (बुधवार) सकाळपासून दहशतवाद विरोधी शाखा, बॅाम्ब शोधक व नाशक पथक, श्वान पथकाने बसस्थानक व टॅक्सी स्टॅंड परिसराची पाहणी केली.

या विषयी अधिक माहिती अशी की, महाराष्ट्राचे मिनी काश्मीर असणाऱ्या महाबळेश्वर बसस्थानकात बॉम्‍ब ठेवला असल्याचा फोन अज्ञात व्यक्तीने (मंगळवार) संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गाडी क्रमांकासह पोलिसांना केला होता. यानंतर पोलिसांनी मोठा फौजफाटा महाबळेश्वर एसटी स्टॕन्डवर घेऊन परिसराची तपासणी केली. मात्र हा फेक कॉल असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्सल यांनी दिली. दरम्यान फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा :  

SCROLL FOR NEXT